Yogendra Yadav On Congress: लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला २३९ जागा तर एनडीएला मिळून २९२ जागा मिळाल्या. काँग्रेस पक्षाला ९९ जागा मिळवण्यास यश आलं. लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात एनडीएच सरकार स्थापन झालं. तर काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते झाले. मात्र, भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीत ‘४०० पार’चा नारा दिला होता. पण एनडीएला केवळ २९२ तर भाजपाला २३९ जागा जिंकता आल्यामुळे भाजपाचं ‘४०० पार’चं स्वप्न भंगलं. मात्र, काँग्रेस पक्षाला ९९ जागा कशा मिळाल्या? आणि काँग्रेस पक्षाचं पुढचं भवितव्य कशावर अवलंबून असेल? याबाबत आता ‘स्वराज्य भारत’चे संस्थापक आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी ‘लोकसत्ता लोकसंवाद’च्या कार्यक्रमात मोठं भाष्य केलं आहे. “लोकसभा निवडणुकीत ९९ जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत. त्यामुळे या संधीचा फायदा राहुल गांधी किती घेतात, यावर काँग्रेसचं भवितव्य अवलंबून असेल. तसेच काँग्रेसला पक्षाची नव्याने बांधणी करावी लागेल”, असं योगेंद्र यादव यांनी म्हटलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा