मतदारांपर्यंत पोहोचण्याचा उमेदवारांचा प्रयत्न
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
निवडणुकीतील रोजगार
प्रथमेश गोडबोले, पुणे</strong>
गेल्या लोकसभा निवडणुकीपासून समाजमाध्यमांमधील प्रचाराची ताकद सर्वानाच समजली. युवा वर्गात निवडणुकीविषयी जागरूकता निर्माण करण्यात समाजमाध्यमांचा वाटा मोठा आहे. त्यामुळे सर्वच उमेदवारांकडून फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, यू-टय़ूब, व्हॉट्स अॅप आदी समाजमाध्यमातून प्रचार होत असून या प्रचारामुळे हजारोजणांना रोजगार मिळाला आहे.
देशात आंतरमहाजाल सेवेचे (इंटरनेट) दर कमी झाल्याने, समाजमाध्यमांचा वापर करणाऱ्यांची संख्या झपाटय़ाने वाढली आहे. तरुण पिढी मोठय़ा संख्येने समाजमाध्यमांशी जोडली गेली आहे. त्यामुळे थेट संवादाचे माध्यम तयार झाले आहे. या माध्यमांचा निवडणूक काळात प्रचारासाठी व्यापक प्रमाणात वापर सुरू झाला आहे. फेसबुक पेज, ट्विटर, इन्स्टाग्राम, यू-टय़ूब, व्हॉट्स अॅप, एसएमएस, व्हॉइस मेसेज (बल्क मेसेज) अशा विविध माध्यमांतून उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.
समाजमाध्यमांतून प्रचार करणे हे एक समूह काम आहे. त्यामध्ये आशय लेखक (कण्टेन्ट रायटर), ग्राफिक्स योजक, प्रत्यक्ष प्रचार व प्रसार करणारा (कॅम्पेनर), समाजमाध्यम व्यवस्थापक, आलेल्या मजकुराचे संपादन करणारा आदींचा सर्वसाधारणपणे समावेश असतो. उमेदवाराला समाजमाध्यमांवर कसा प्रचार करायचा आहे, यानुसार या कामासाठी पक्षाकडून वा उमेदवाराकडून किती पैसे घ्यायचे ते ठरते. साधारणपणे पाच हजारांपासून पाच लाखांपर्यंत समाजमाध्यमांतून प्रचारासाठी पैसे मोजले जातात, अशी माहिती संगणकप्रणाली अभियंता प्रशांत जोशी यांनी दिली. याबरोबरच प्रत्येक उमेदवाराची समाजमाध्यमे हाताळणारी स्वत:ची टीम असते. त्यांना प्रशिक्षण दिले जाते, या माध्यमातूनही रोजगार निर्मिती होत आहे. यंदा हा कल सर्वाधिक आहे, असेही जोशी यांनी सांगितले.
‘सद्य:स्थितीत सर्वच राजकीय पक्ष समाजमाध्यमांतून प्रचार करतात. प्रत्येक खासदार, आमदारांची स्वत:ची समाजमाध्यमे हाताळणारी टीम असतेच. हा कल आता नगरसेवकांपर्यंतही पोहोचला आहे’, असे निष्क टेक्नॉलॉजीचे सचिन जाधव यांनी सांगितले.
समाजमाध्यमांवरील प्रचार आणि रोजगार
समाजमाध्यमे हाताळणाऱ्याकडून संबंधित पोस्ट, व्हीडीओ, छायाचित्राला किती लाइक, शेअर आले हे तपासले जाते. समाजमाध्यम व्यवस्थापक संबंधित भागातील कल तपासून कुठे, कसा प्रचार करायचे हे ठरवतो. आशय लेखक (कण्टेन्ट रायटर) एखादी टॅग लाइन लिहिणे, चारोळी लिहिणे, ट्विटरवर हॅशटॅगच्या माध्यमातून संदेश लिहिणे आदी कामे करतात. ग्राफिक्स योजक विविध संदेश आणि छायाचित्रे ग्राफिक्सच्या माध्यमातून प्रभावी बनवतात. प्रत्यक्ष प्रचार व प्रसार करणारा (कॅम्पेनर), प्रचार करण्यासाठी उपलब्ध मजकुराचे संपादन करणारा यांचाही या प्रचारात समावेश असतो.
२१ व्या शतकातील समाज माहितीप्रधान समाज आहे. पाश्चात्य राष्ट्रांत फेसबुक, ट्विटर, यू-टय़ूब अशा माध्यमांचा वापर राजकीय व्यक्ती आणि संस्थांकडून राजकारणात आणि निवडणुकीत पूर्वीपासून होत आहे. भारतात गेल्या लोकसभा निवडणुकीपासून समाजमाध्यमांचा वापर प्रभावीपणे प्रचारासाठी करण्यात येत आहे. ते हाताळणाऱ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली, असे नक्कीच म्हणू शकतो.
– प्रशांत जोशी, संगणकप्रणाली अभियंता