लोकसभा निवडणुका अवघ्या दोन ते तीन महिन्यांवर आलेल्या असताना काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भारत न्याय यात्रा काढली आहे. एकीकडे राहुल गांधी मणिपूरमधून भारत न्याय यात्रेतून सामान्य मतदारांशी संवाद साधत असताना दुसरीकडे सत्ताधारी भाजपाकडून या यात्रेवरून राहुल गांधींवर टीका केली जात आहे. आता निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राहुल गांधींच्या या यात्रेवरून व काँग्रेसच्या नेतृत्व निवडीवरून परखड भाष्य केलं आहे. भारत न्याय यात्रा काढण्याची ही सर्वात चुकीची वेळ असल्याची टिप्पणी प्रशांत किशोर यांनी केली आहे.

“राहुल गांधी काँग्रेस चालवतायत पण…”

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रशांत किशोर यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर व आगामी लोकसभा निवडणुकांवर भाष्य केलं. “राहुल गांधी जर स्वत: काँग्रेस चालवत नसतील तर त्यांनी हे सांगितलं पाहिजे की ते काँग्रेस चालवत नाहीत. पण समस्या ही आहे की ते काँग्रेस चालवत आहेत आणि ते हे जाहीरपणे मान्य करत नाहीयेत”, असं प्रशांत किशोर म्हणाले.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
najma heptulla on indira gandhi emergency
Indira Gandhi: “इंदिरा गांधींना आणीबाणीचा पश्चात्ताप होत होता”, नजमा हेपतुल्ला यांचा आत्मचरित्रात दावा; विश्वासू व्यक्तींबाबतही होती तक्रार!
Sharad Pawar News
Uday Samant : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण
Radhakrishna Vikhe Patil On Balasaheb Thorat
Radhakrishna Vikhe Patil : “तेव्हाच सांगितलं होतं आधी निवडून तर या”, राधाकृष्ण विखेंचा बाळासाहेब थोरातांवर हल्लाबोल

यात्रेसाठीची सगळ्यात चुकीची वेळ?

दरम्यान, “यात्रेसाठी ही सगळ्यात चुकीची वेळ आहे. यात्रा ६ महिने किंवा वर्षभरापूर्वीच काढली जायला हवी होती”, असं प्रशांत किशोर म्हणाले. “आत्ता तुमच्या मित्रपक्षांच्या भेटीगाठी करणे, साधनांची जुळवाजुळव करणे, तुमचे उमेदवार ठरवणं या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुमची मुख्यालयात गरज आहे. पण आत्ता तुम्ही रस्त्यावर उतरून यात्रा करत आहात. जेव्हा तुम्ही रस्त्यावर उतरायला हवं होतं, तेव्हा तु्म्ही दिल्लीत होतात. मला माहिती नाही की त्यांना कोण सल्ले देत आहे”, अशा शब्दांत प्रशांत किशोर यांनी राहुल गांधींच्या यात्रेचं विश्लेषण केलं आहे.

“संसदेत धुडगूस घालून लोकशाही मूल्यांचं वस्त्रहरण करणाऱ्यांनी…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका

“खर्गे दिल्लीत पोहोचेपर्यंत नितीश कुमार…”

“कल्पना करा, बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या रुपाने तुमचा एक मोठा घटकपक्ष सोडून जात आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी तुम्ही कंबर कसून काम करणं आवश्यक आहे. मल्लिकार्जुन खर्गेंचं वक्तव्य मी वाचलं. ते म्हणाले की मला ही माहिती मिळाली आहे. मी दिल्लीला पोहोचून याचा आढावा घेईन. पण तोपर्यंत सगळं घडून गेलं होतं. खर्गे दिल्लीत पोहोचेपर्यंत नितीश कुमारांचा शपथविधी झाला होता. हा धोरणात्मक कॉमन सेन्स आहे”, असंही प्रशांत किशोर म्हणाले.

“राहुल गांधींकडे स्पष्टता असायला हवी. काँग्रेस किंवा विरोधकांनी पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत स्पष्ट धोरण जाहीर करायला हवं. मग ते राहुल गांधी असोत किंवा मल्लिकार्जुन खर्गे असोत. निर्णय न घेतल्यामुळे काँग्रेसचं नुकसान होत आहे. जर राहुल गांधींना पंतप्रधान व्हायचं नसेल, तर त्यांनी स्वत: ते जाहीर करायला हवं. पण राहुल गांधी हे सांगत नाहीयेत”, असंही प्रशांत किशोर म्हणाले.

“मोदींना बाजूला केलं तर भाजपाच्या अनेक उमेदवारांना जिंकणं अवघड असेल”

“मोठ्या प्रमाणात भाजपाला मिळणारी मतं पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे येतात. जर तुम्ही स्थानिक उमेदवारांना त्या त्या भागात विचारणा केलीत तर तेही ही गोष्ट मान्य करतील. भाजपाकडून हाच हिंदुत्वाचा अजेंडा, हीच धोरणं, हीच कामगिरी असली, तरी फक्त मोदींना हटवा, भाजपाच्या अनेक उमेदवारांना निवडणूक जिंकणं कठीण असेल”, असा दावा प्रशांत किशोर यांनी केला आहे.

Story img Loader