उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना मदत म्हणून ७५, १००, १५० आणि २३० रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले आहे. अवकाळी पावसामुळे त्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने १०० रुपयांचा धनादेश देऊन त्यांच्या जखमेवर मीठ चेळण्याचे काम केले आहे. पीकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान सहन कराव्या लागलेल्या शेतकऱ्यांना केवळ १०० रुपयांचा धनादेश देऊन सरकारने सारवासारव केल्याचाच हा प्रकार आहे, असा आरोप करण्यात येतो आहे. उत्तर प्रदेशातील फैजाबाद जिल्ह्यातील वजिदपूर गावामधील पिकांची झालेली नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना ७५, १००, १५० आणि २३० रुपयांचे धनादेश वाटण्यात आले. माध्यमातून या प्रकाराविरुद्ध आवाज उठल्यानंतर आता प्रशासन मेळावे घेऊन शेतकऱ्यांचे धनादेश बदलण्याचे काम करीत आहे.

Story img Loader