दिल्लीच्या हवेतील प्रदूषण मानवी सहनशीलतेच्या पलीकडचे आहे असे नवीन माहितीवरून दिसून आले आहे.
भूमिगत मेट्रोच्या ठिकाणी मात्र प्रदूषणाचे प्रमाण मात्र कमी दिसून आले आहे असे सेंटर फॉर सायन्स अँड एनव्हरॉनमेंट या संस्थेने म्हटले आहे. दिल्ली हे जगातील सर्वात प्रदूषित शहरांपैकी एक असून  हवा प्रदूषणाची पातळी सरासरी पातळीपेक्षा २ ते ४ पटींनी वाढली आहे.
वाहतूक पोलिस अत्यंत वाईट हवेत श्वासोच्छवास करीत असून आयटीओ चौकात प्रदूषणाची पातळी आठ पटींनी अधिक आहे. मेट्रोच्या ठिकाणी मात्र सर्वात कमी म्हणजे दर घनमीटरला २०९ मायक्रोग्रॅम इतके कमी प्रदूषण आहे.
 पहाडगंज येथे प्रदूषणाची पातळी ११७० मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर, तर गोविंदपुरी मेट्रो स्टेशन येथे ७२५ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर नोंदली गेली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २४ वर डिझेल ट्रकमुळे प्रदूषण ६५१ ते २००० मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर होते.

Story img Loader