Student Fell From Hotel Third Floor : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विविध घटना समोर येत आहेत. आता हैदराबाद येथून धक्कादायक माहिती समोर आली आहे. मित्राच्या वाढदिवसाला गेलेल्या एका विद्यार्थ्याचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. हा विद्यार्थी कुत्र्याचा पाठलाग करत होता. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
हैदराबादच्या चंदनगरमधील व्ही. व्ही. प्राईड या हॉटेलमध्ये वाढदिवसाचं सेलीब्रेशन सुरू होतं. तेव्हा पॉलिटेक्निकचा एक विद्यार्थी उदय कुमार (२४) हासुद्धा या सेलिब्रेशनसाठी आला होता. वाढदिवसाचं सेलीब्रेशन सुरू असताना तो कॉरिडॉरमध्ये आला. त्याला तिथे एक कुत्रा दिसला. तो त्या कुत्र्याचा पाठलाग करत होता. परंतु, तेवढ्यात खिडकीजवळ येऊन त्याचा पाय घसरला आणि खिडकीतून तोल जाऊन तो खाली पडला.
23-year-old Uday slipped from the third floor of the VV Pride Hotel in #Chandanagar while chasing a dog. New CCTV footage clarifies earlier reports. Investigations are ongoing to understand the circumstances surrounding the incident. #Hyderabad pic.twitter.com/5lQrvLaiQW
— Viral Content (@ViralConte97098) October 22, 2024
हेही वाचा >> Pakistan : धक्कादायक! सोशल मीडिया वापरत असल्याच्या रागातून तरुणाने आई, बहीण, भाची आणि मेहुणीची केली हत्या
हॉटेलमधील घटना सीसीटीव्हीत कैद
सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे. उदय कुमार कुत्र्याबरोबर खेळत होता. परंतु, खेळता खेळता तो खिडकीतून खाली पडला. तो खाली पडल्याचा आवाज येताच त्याचे मित्रही तत्काळ बाहेर आले. परंतु, मित्र बाहेर येऊन त्याला वाचवेपर्यंत तो तिसऱ्या मजल्यावरून खाली कोसळला होता. त्यामुळो डोक्याला हात लावण्याशिवाय त्यांच्या मित्रांच्या हाती काहीही उरलं नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुमारचा जागीच मृत्यू झाला. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी गांधी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.