पोप फ्रान्सिस यांनी युक्रेनमध्ये रशियाने सुरु केलेल्या लष्करी मोहीमेला विशेष लष्करी मोहीम म्हणण्यास नकार दिलाय. थेट रशियाचा उल्लेख पोप यांनी टाळला असला तरी युक्रेनमधील लष्करी मोहीमेबद्दल त्यांनी भाष्य केलंय. हे युक्रेनवर लादण्यात आलेलं युद्धच असल्याचं मत पोप फ्रान्सिस यांनी व्यक्त केलंय. (युद्धाचे लाइव्ह अपडेट्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा) रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनविरोधातील मोहीमेला विशेष लष्करी मोहीम म्हटलंय. मात्र आता या भूमिकेच्या विरोधात भूमिका पोप फ्रान्सिस यांनी मांडलीय.

नक्की पाहा >> Photos: युक्रेनमध्ये शिरलेल्या रशियन तोफा, गाड्यांवर Z, O, X, V अक्षरं का लिहिली आहेत? त्यांचा अर्थ काय?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की काय म्हणाले पोप फ्रान्सिस?
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार पोप फ्रान्सिस व्हेटिकन सिटीमध्ये नेहमीप्रमाणे दर आठवड्याला रविवारी उपस्थितांना संबोधित करतात. याच संबोधनादरम्यान यांनी युक्रेन युद्धाचा उल्लेख केला. युक्रेनमध्ये आपण केवळ विशेष लष्करी मोहीम राबवित असल्याचा रशियाचा दावा पोप फ्रान्सिस यांनी फेटाळून लावला आहे. रशियाचे नाव न घेता ते म्हणाले की, “युक्रेनवर युद्ध लादण्यात आले आहे. युक्रेनमध्ये रक्त आणि अश्रूंच्या नद्या वाहत आहेत. हे युद्धच असून त्यात मृत्यू, विध्वंस आणि दुर्घटनांची बीजे पेरली जात आहेत.”

नक्की वाचा >> Ukraine War: “मी मेलो तरी…”; पाळीव बिबट्या, ब्लॅक पँथरला युक्रेनमध्ये सोडून येण्यास भारतीयाचा नकार

केलं महत्वाचं आवाहन…
सेंट पीटर्स चौकातील साप्ताहिक मेळाव्यात जमलेल्या नागरिकांपुढे बोलताना पोप फ्रान्सिस यांनी ही उघड नाराजी व्यक्त केली. त्यांनी यावेळी शांततेचे आवाहन केले. नागरिकांना सुरक्षित जाण्यासाठी मार्ग उपलब्ध करून देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

रशिया आपल्या भूमिकेवर ठाम
रशियाच्या मागण्या मान्य करण्यात आल्या तरच युक्रेनवरील लष्करी कारवाई थांबवण्यात येईल, असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी रविवारी सांगितले. पाश्चिमात्य देशांनी रशियावर लादलेल्या आर्थिक निर्बंधांची तुलना त्यांनी युद्धाशी केली.

नक्की पाहा >> देशाचं नाव चुकीचं घेतल्यानं नारायण राणे ट्रोल; मुंबई विमानतळावरील व्हिडीओ झाला व्हायरल

सुरक्षित कॉरिडोअरचा प्रयत्न फेल
रशियन सैन्याने वेढा दिलेल्या मारियुपोल या बंदरांच्या शहरामध्ये युद्धविराम पाळण्याचा दुसरा प्रयत्नही रविवारी फोल ठरला. युद्धग्रस्त भागातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी कॉरिडॉर तयार करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले. याचे खापर रशियन समर्थक फुटीरतावादी आणि युक्रेनचे लष्कर यांनी एकमेकांवर फोडले.

नक्की वाचा >> Ukraine War: “या गुलाबाच्या फुलाचं काय करु? त्यापेक्षा…”; युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्याची केंद्र सरकारवर टीका

१५ लाख लोकांनी देश सोडला…
रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून आजपर्यंत तो देश सोडणाऱ्यांची संख्या सुमारे १५ लाखांहून अधिक झाली आहे. युक्रेनच्या नागरिकांनी युरोपातील शेजारी राष्ट्रांमध्ये आश्रय घेतला आहे. त्यामुळे दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपवर निर्वासितांचे संकट तीव्र होत असल्याचे निरीक्षण संयुक्त राष्ट्रांनी रविवारी नोंदवले. दुसरीकडे, रशियन सैन्य आता काळय़ा समुद्रातील ओडेसा बंदर शहरावर बॉम्बफेक करण्याच्या तयारीत असल्याची भीती युक्रेनने व्यक्त केली आहे.

नक्की वाचा >> Ukraine War: मोठी बातमी! पुतिन यांनी Nuclear Attack च्या भीतीने आपल्या कुटुंबियांना…

११ हजार सैनिक मारल्याचा दावा…
रशियाने २४ फेब्रुवारी रोजी युक्रेनवर आक्रमण केले. तेव्हापासून आतापर्यंत ११ हजारहून अधिक रशियन सैनिक मारले गेल्याचा दावा, युक्रेनच्या संरक्षण दलाने केला. मात्र, युद्धात युक्रेनची किती लष्करी हानी झाली, याबद्दल माहिती देण्यात आली नाही.

नक्की वाचा >> Ukraine War: पुतिन यांना मोठा धक्का! झेलेन्स्कींच्या हत्येसाठी पाठवलेल्या ‘चेचेन स्पेशल फोर्स’चा युक्रेनकडून खात्मा

किव्हभोवतीची सुरक्षा वाढवली…
युक्रेन लष्कराने रविवारी राजधानी किव्हभोवतीची तंटबंदी मजबूत केली. शहराभोवती मोठय़ा प्रमाणावर खंदक खोदण्यात आले. रस्त्यांवर अडथळे निर्माण करण्यात आले. रशियन सैन्याने किव्ह शहराच्या आसपासच्या भागांवर बॉम्बफेक केल्याने तेथील नागरिक मोठय़ा प्रमाणावर स्थलांतर करीत आहेत.

नक्की वाचा >> Ukraine War: “माझ्यासोबत बसा, आपण अगदी…”; युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी पुतिन यांना सुचवला ‘युद्ध संपवण्याचा एकमेव मार्ग’

रशियातील आंदोलक ताब्यात…
युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांनी रविवारी रशियन नागरिकांना युक्रेनवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्याचे आवाहन केले. तर आठवडय़ाभरापासून युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणाच्या निषेधार्थ निदर्शने करणाऱ्या एक हजारहून अधिक रशियन नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.