समीर जावळे

R. G. Kar Hospital : कोलकाता येथील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय ( R.G. Kar Hospital ) या ठिकाणी एका महिला डॉक्टरवर बलात्कार झाला. त्यानंतर अत्यंत क्रूरपणे तिची हत्या करण्यात आली. या घटनेचे पडसादर देशभरात उमटले आहेत. देशभरात शनिवारी म्हणजेच १७ ऑगस्टला डॉक्टरांनी या अन्यायाविरोधात आंदोलनही केलं. अशात आता आर.जी. कर महाविद्यालय आणि रुग्णालयाचा काळा इतिहास या घटनेमुळे समोर आला आहे.

India-Canada Conflict United States reacts
India Canada Row: अमित शाह यांच्याविरोधातील कॅनडाचे आरोप चिंताजनक; अमेरिकेची प्रतिक्रिया, भारत-कॅनडा वाद चिघळणार?
train hits student sitting on track with headphones
हेडफोन आणि मोबाइल ठरलं मृत्यूचं कारण; रेल्वे ट्रॅकवर…
Canada amit shah
शीख फुटीरतावाद्यांना लक्ष्य करण्यात शहांचा हात, कॅनडातील वरिष्ठ अधिकाऱ्याचा आरोप
india china Disengagements
पूर्व लडाखमध्ये सैन्यमाघारी पूर्ण, भारत-चीन सैनिकांमध्ये आज दिवाळीच्या मिठाईची देवाणघेवाण
Sukesh Chandrashekhar and Jacqueline Fernandez
Sukesh Chandrashekhar : “आपली प्रेमकथा रामायणाच्या तोडीची”, जॅकलीन फर्नांडीसला ‘सीता’ म्हणत सुकेश चंद्रशेखरचं तुरुंगातून पत्र
lawrence bishnoi interview
पोलीस स्टेशन नव्हे, लॉरेन्स बिश्नोईचा स्टुडिओ? उच्च न्यायालयानं पोलिसांना घेतलं फैलावर!
taliban ban on women
तालिबानचा नवा फतवा: महिलांना मोठ्याने कुराण पढण्यासही बंदी
Amit Shah, justin trudeau
Amit Shah Canada : “कॅनडातील फुटीरतावाद्यांविरोधातील हिंसेमागे अमित शाह”, ट्रुडो सरकारचे गंभीर आरोप
India retail sector
Diwali 2024 : यंदा बाजारात ‘व्होकल फॉर लोकल’चा प्रभाव; चीनी वस्तूंच्या विक्रीत घट; चीनला १.२५ लाख कोटी रुपयांचा फटका बसण्याची शक्यता

९ ऑगस्टला नेमकी काय घटना घडली?

९ ऑगस्टला सकाळी एक महिला डॉक्टर आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातल्या ( R.G. Kar Hospital ) सेमिनार हॉलमध्ये मृतावस्थेत आढळली. तिचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत होता. तिच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं तेव्हा तिच्यावर बलात्कार झाला असल्याची बाब समोर आली. तिच्या शरीरावर आणि गुप्तांगावर अनेक जखमा होत्या. तिच्या डोळ्यांमधूनही रक्त वाहात होतं अशीही माहिती समोर आली. त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या मुलीला न्याय दिला पाहिजे अशी मागणी होते आहे. अत्यंत क्रूर पद्धतीने तिची हत्या करण्यात आली. त्याआधी तिच्यावर पाशवी बलात्कार करण्यात आला. या प्रकरणात आरोपी संजय रॉयला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून केला जातो आहे. दरम्यान या रुग्णालयाचा ( R.G. Kar Hospital ) काळा इतिहास समोर आला आहे.

हे पण वाचा- Sanjoy Roy : “संजय रॉयला फाशी दिली तरीही आम्हाला काहीच..”, कोलकाता प्रकरणातील आरोपीच्या सासूची प्रतिक्रिया

नेमकं काय घडलंय याआधी?

महिला डॉक्टरवर बलात्कार आणि त्यानंतर तिची हत्या होणं ही आर. जी. कर रुग्णालयातली ( R.G. Kar Hospital ) पहिली घटना नाही. मागच्या २३ वर्षांमध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्यामुळे हे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. काही केसेस अजूनही अनुत्तरीतच आहेत.

२००१ मधलं सौमित्र बिस्वास प्रकरण

२००१ मध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सौमित्र बिस्वास या विद्यार्थ्याचा मृतदेह आर. जी. कर महाविद्यालयात ( R.G. Kar Hospital ) आढळून आला होता. या महाविद्यालयाच्या आवारात जे वसतिगृह आहे तिथल्या खोलीत फास लावलेल्या अवस्थेत या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आला. त्यावेळी त्याच्या मित्रांनी, सहकाऱ्यांनी हे म्हटलं होतं की हे आत्महत्येचं प्रकरण नाही. या विद्यार्थ्याच्या आईनेही हा आरोप केला होता की तिच्या मुलाची हत्या करण्यात आली आहे. पोर्नोग्राफीशी संबंधित रॅकेट रुग्णालयात सुरु आहे हे माझ्या मुलाला समजलं होतं त्यामुळे त्याला मार्गातून दूर करण्यात आलं असा आरोप सौमित्र बिस्वासच्या आईने केला. अद्यापही हे प्रकरण आणि त्याभोवती असलेलं गूढ कायम आहे.

२००१ मध्ये इंटर्नचा मृत्यू

२००१ मध्ये आर. जी. कर महाविद्यालयात ( R.G. Kar Hospital ) एका इंटर्न डॉक्टरचा मृतदेह आढळला होता. त्याने अँटी डिप्रेशनचा ओव्हरडोस घेतल्याने त्याचा मृत्यू झाला असं कारण तेव्हा समोर आलं होतं. साधारण तो सहा महिने हे औषध घेत होता. त्याला हे औषध का घ्यावंसं वाटत होतं तो नेमका कोणत्या तणावाखाली होता? याची उत्तरं अद्याप सापडेलली नाहीत.

२००३ चं आत्महत्येचं प्रकरण

२००३ मध्ये आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय ( R.G. Kar Hospital ) या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने आत्महत्या केली असं सांगण्यात आलं. हा कर्मचारी काहीसा अंतर्मुख होता, त्याने रुग्णालयाच्या छतावरुन उडी मारली आणि आयुष्य संपवलं त्यापूर्वी त्याने हाताची नस कापली होती. या प्रकरणातही उलटसुलट पैलू समोर आले. मात्र हे प्रकरणही अद्याप एक कोडंच आहे. अद्यापही नेमकं काय घडलं होतं? ती हत्या होती की आत्महत्या होती हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

२०१६ मध्ये प्राध्यापकांचा गूढ मृत्यू

२०१६ मध्ये झालेल्या एका घटनेत आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात ( R.G. Kar Hospital ) गौतम पाल नावाचे एक प्राध्यापक कार्यरत होते. त्यांचा मृत्यू याच वर्षी झाला. ते डिपार्टमेंट हेड म्हणून रुग्णालयात काम करत होते. मात्र त्यांच्या घरात एक दिवस त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांचा मृत्यू झाला आहे हे सुरुवातीला कुणालाच समजलं नाही. त्यांच्या घराच्या शेजारी राहणाऱ्यांना त्यांच्या घरातून दुर्गंध येऊ लागला. त्यावेळी त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दार उघडून पाहिलं तेव्हा आतमध्ये गौतम पाल यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या चेहऱ्यावर काही जखमांच्या खुणा होत्या. त्यांचा मृत्यू कसा झाला? हे समजू शकलेलं नाही. पोलिसांनी प्राथमिक अंदाज व्यक्त केला होता की त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. मात्र या प्रकरणात पुढे काहीही घडलं नाही.

R. G. Kar Medical Hospital Black History
आर. जी. कर मेडिकल रुग्णालयाचा काळा इतिहास आता समोर आला आहे. (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

पुलोमी सहा प्रकरण २०२०

आर. जी. कर महाविद्यालय ( R.G. Kar Hospital ) पुलोमी सहा प्रकरणामुळेही चर्चेत आलं होतं. पुलोमी सहा ही ट्रेनी डॉक्टर होती. तिने २०२० मध्ये रुग्णालयाच्या छतावरुन उडी मारुन आयुष्य संपवलं. उडी मारल्यानंतर तिला जखमी अवस्थेत रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तिचा जीव वाचू शकला नाही. आत्महत्येच्या काही दिवस आधी ती प्रचंड तणावाखाली होती असंही तिच्या सहकाऱ्यांनी सांगितलं होतं. पुलोमी सहाच्या आत्महत्येने या रुग्णालयाबाबत अनेक प्रश्न निर्माण केले होते जे अद्याप सुटलेले नाहीत.

महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येमुळे चर्चेत आलेल्या कोलकाता येथील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचा हा काळा इतिहास आता समोर आला आहे. डीएनएने याबाबतचं वृत्त दिलं आहे.