टपाल खात्याने जनतेशी संपर्क साधण्यासाठी एक अभिनव अभियान सुरू केले असून त्याचाच एक भाग म्हणून टपाल महाव्यवस्थापकांच्या फेरफटक्याचा कार्यक्रम शुक्रवारी येथे हाती घेण्यात आला होता. अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करणारे जम्मू आणि काश्मीर हे देशातील पहिलेच राज्य आहे.
मुख्य टपाल महाव्यवस्थापक जॉन सॅम्युअल यांनी शुक्रवारी लाल चौक या बाजारपेठ विभागात आणि निवासी संकुले असलेल्या विभागात पेरफटका मारला.
या वेळी त्यांच्यासमवेत स्थानिक पोस्टमन आणि अन्य अधिकारी होते. या सर्व अधिकाऱ्यांनी ग्राहकांशी हितगुज केले.
टपाल विभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या विविध प्रकारच्या सेवांची ग्राहकांना माहिती करून देणे आणि टपाल विभागाला ग्राहकांच्या अधिकाधिक जवळ नेणे, हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. हे जनसंपर्क अभियान असून त्याची सुरुवात काश्मीरमध्ये झाल्यास देशभरात त्याचे अनुकरण करण्यात येईल, असा विष्टद्धr(२२४)वास या वेळी सॅम्युअल यांनी व्यक्त केला.
टपाल कार्यालयाचे नेमके काम काय आहे, त्याची जनतेला जाणीव करून देणे आणि त्या मार्गाने जनतेच्या अधिक जवळ जाणे यासाठी हे अभियान असून त्याद्वारे टपाल विभागाला सर्वोच्च ठिकाणी बसविण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा