सतारवादक पंडित रवीशंकर, गायक भीमसेन जोशी व कर्नाटक संगीतातील पाश्र्वगायिका डी. के. पट्टामल ही संगीत क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्वे तसेच चित्रपट क्षेत्रातील नामवंत अभिनेते व अभिनेत्रींच्या स्मृतिप्रीत्यर्थ टपाल खाते खास तिकिटे जारी करणार आहे.
येत्या दोन जुलैला प्रकाशित करण्यात येणाऱ्या या टपाल तिकिटात संगीतकार मालिकेत मल्लिकार्जुन मन्सूर, कुमार गंधर्व, गंगूबाई हनगळ, उस्ताद इलियाद खान यांचाही समावेश आहे. चालू वर्षांत एकूण ५२ टपाल तिकिटे जारी केली जाणार असून त्यातील काही नामवंत अभिनेते-अभिनेत्रीच्या स्मृतिप्रीत्यर्थही आहेत. ती तिकिटे भारतीय चित्रपटसृष्टीच्या शताब्दीनिमित्त आहेत. भारतातील सौंदर्यपूर्ण हस्तपंखे, बोटी, वन गाढवे, कच्छमधील पायऱ्यांच्या विहिरी, पगडी यांचाही समावेश टपाल तिकिटात करण्यात आला आहे. भारतातील अनेक शतकातील वाहतुकीची साधने या विषयावरही टपाल तिकिटे काढली जाणार आहेत.
 भाक्रानांगल धरणाचा सुवर्णमहोत्सव, दिल्ली जिमखाना क्लब, भारतीय विद्याभवनची पंचाहत्तरी, भारतातील आदिवासींची घरे, गुप्तचर संस्था, काक्रापारा व जमालपूर येथील रेल्वे कार्यशाळा यावरही टपाल तिकिटे जारी केली जाणार आहेत. संरक्षण क्षेत्रात चेन्नईची अधिकारी प्रशिक्षण अकादमी आयएनएस विक्रमादित्य यावरही टपाल तिकीट काढले जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा