जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा नेता आणि देशद्रोही कन्हैया कुमारला गोळ्या घालून ठार मारणाऱ्याला ११ लाखांचे बक्षीस दिले जाईल, अशा आशयाचे अनेक पोस्टर्स सध्या नवी दिल्लीतील बसस्टॉप आणि मेट्रो स्टेशनवर दिसून येत आहेत. या पोस्टर्समुळे सध्या दिल्लीत एकच खळबळ उडाली आहे. मध्य दिल्लीतील अनेक भागांत पूर्वांचल सेनेच्या नावे ही पोस्टर्स लावण्यात आली आहेत. या संघटनेचा अध्यक्ष असलेल्या आदर्श शर्मा याने आम्ही अशाप्रकारची तब्बल १,५०० पोस्टर्स शहरात लावल्याचे सांगितले. यामध्ये कन्हैयाला गोळ्या घालून ठार मारणाऱ्याला ११ लाखांचे इनाम दिले जाईल, असा मजकूर लिहलेला आहे. विशेष म्हणजे हा आदर्श शर्मा बिहारमधीलच असून त्याचे गाव कन्हैया कुमारच्या गावापासून अवघ्या १० किलोमीटर अंतरावर आहे.
पंतप्रधानांशी वैचारिक मतभेद; मनभेद नाही- कन्हैया कुमार
दिल्ली उच्च न्यायालयाने सहा महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैयाकुमार याने गुरुवारी देशद्रोहाच्या आरोपप्रकरणी जातमुचलका सादर केल्यानंतर त्याची तिहार कारागृहातून गुरुवारी सुटका करण्यात आली होती. यानंतर कन्हैया कुमार याने शुक्रवारी विद्यापीठाच्या परिसरात पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला होता.
मी राजकारणी नाही, विद्यार्थीच! 

Story img Loader