इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावलेल्या मध्य प्रदेशातील एका पोस्टमास्टरने एक कोटी रुपये गमवावे आहेत. त्याने सट्टेबाजीसाठी तब्बल २४ कुटुंबांची एक कोटी रुपयांची बचत पणाला लावल्याचा आरोप आहे. या कुटुंबांच्या मुदत ठेवीचे पैसे सागर जिल्ह्यातील सब पोस्ट ऑफिसमध्ये जमा करायचे होते. पण पोस्टमास्तरने या पैशांचा सट्टा खेळला. बीना सब पोस्ट ऑफिसचे पोस्टमास्टर विशाल अहिरवार यांना बीना रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) २० मे रोजी अटक केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांसमोर त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे सांगण्यात येत आहे. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितले की, पोस्टमास्तरने बनावट एफडी खात्यांसाठी खरे पासबुक जारी केले आणि मागील दोन वर्षांपासून सर्व पैसे आयपीएल क्रिकेट सट्ट्यामध्ये गुंतवले. बीना जीआरपी स्टेशन प्रभारी अजय धुर्वे यांनी ही माहिती दिली. ही घटना उघडकीस आल्यानंतर गुंतवणूकदारांचे लाखो रुपये बुडल्याने त्यांची अवस्था बिकट आहे.

“अटक करण्यात आलेल्या सब पोस्टमास्टर विशाल अहिरवारवर आता कलम ४२० आयपीसी (फसवणूक) आणि ४०८ आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासाच्या निकालाच्या आधारे, या प्रकरणात आणखी कलमे लावली जाऊ शकतात,” असे बीना-जीआरपी पोलीस ठाण्याचे प्रभारी अजय धुर्वे यांनी सांगितले.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, विशाल अहिरवारवर बीनापूर्वी सागर जिल्ह्यातील खिमलासा येथे तैनात होते. आर्थिक अनियमिततेच्या आरोपावरून त्यांना निलंबित करण्यात आले. यातील एका पीडितेने सांगितले की, “कोविडमुळे मी पती आणि सासरे गमावले आहेत. माझ्या पतीने मृत्यूपूर्वी ९ लाख रुपये जमा केले होते. परंतु मला नुकतेच विशाल अहिरवारच्या फसवणुकीची माहिती मिळाली आहे. यानंतर मी पोस्ट ऑफिसमध्ये गेलो, तिथे मला सांगण्यात आले की मुदत ठेव खाते क्रमांक अस्तित्वात नाही. माझे पती आणि सासरे आता हयात नाहीत, मला आता काय करावे हे समजत नाही.”