दिल्लीत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका वादातून अल्पवयीन प्रेयसीवर चाकूने सपासप वार करून प्रियकराने खून केला आहे. साहिल असं आरोपी तरुणांचं नाव आहे. ही घटना शाहबाज परिसरात घडली असून, सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पोलिसांनी आरोपी साहिलला बुलंदशहरमधून अटक केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

दिल्लीतील जेजे कॉलनी येथे राहणाऱ्या १६ वर्षीय तरुणीचं आणि साहिलशी प्रेमसंबंध होते. रविवारी ( २८ मे ) रात्री अल्पवयीन तरुणी आपल्या मैत्रिणीच्या मुलाच्या वाढदिवसाला जात होती. तेव्हाच साहिलला तिने अडवलं. यावेळी दोघांमध्ये जोरदार वाद झाला. याच रागातून साहिलने तरुणीवर चाकूने सपासप २१ वार केले. त्यानंतर दगडाने तरुणीचं डोक ठेचण्यात आलं. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा : दिल्लीत अल्पवयीन मुलीवर चाकूचे २० वार आणि दगडाने ठेचलं! सीसीटीव्ही फुटेज आलं समोर

दगडाने ठेचल्याने डोक…

आता १६ वर्षीय तरुणीचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. यात तरुणीच्या शरीरावर चाकूने १६ वार केल्याचं सांगितलं आहे. तसेच, दगडाने ठेचल्याने डोक फुटलं आहे. ‘तरुणीच्या गळ्यावर चाकूचे ६ वार आहेत. तर पोटावर १० वार आहेत,’ असं शवविच्छेदन अहवालात म्हटलं आहे. पोलीस पूर्ण शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत.

हेही वाचा : सुट्टीसाठी जाताना बस आणि इन्होवा कारचा भीषण अपघात, २ लहान मुलांसह १० जणांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

१० दिवसांपासून तरुणी मैत्रिणीच्या घरी…

तरुणीच्या आईने म्हटलं की, “मुलगी गेल्या १० दिवसांपासून मैत्रिणीच्या घरीच राहत होती. आम्ही मुलीला अनेकवेळा साहिलबाबत विचारलं होतं. साहिलला फाशीची शिक्षा दिली पाहिजे,” अशी मागणी तरुणीच्या आईने केली.

Story img Loader