कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेला बुंदेलखंड एक्स्प्रेस वेवर पाच दिवसांत पावसामुळे खड्डे पडले आहेत. १६ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या एक्स्प्रेस वेवचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र, पाच दिवसांतच या हायवेवर खड्डे पडल्याने विरोधकांकडून टीका होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुंदेलखंड एक्स्प्रेस वेवर काल रात्रीच्या सुमारास सलेमपूरजवळ रस्त्याचा काही भाग खचला होता. त्यामुळे या ठिकाणी अपघातही झाला. यावेळी स्थानिकांनी या खचलेल्या भागाचा व्हिडीओ बनवत सोशल मीडियावर व्हायरल केला. असाच प्रकार औरेया गावाजवळही घडला आहे. येथेही रस्त्याचा काही भाग खचला आहे. त्यामुळे या रस्त्याच्या गुणवत्तेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

हेही वाचा – नगसेवक ते देशाच्या १५व्या राष्ट्रपती; द्रौपदी मुर्मू यांचा थक्क करणारा राजकीय प्रवास

१६ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या एक्स्प्रेस वेचे उद्घाटन केले होते. यावेळी बोलताना ”बुंदेलखंड एक्स्प्रेस वेने चित्रकूट ते दिल्ली हे अंतर ३ ते ४ तासांनी कमी झाले आहे. या एक्स्प्रे-वेमुळे येथील वाहनांना वेग तर मिळेल. त्यासोबतच संपूर्ण बुंदेलखंडच्या औद्योगिक प्रगतीलाही गती मिळेल”, अशी प्रतिक्रिया दिली होती.