दारिद्रय़ात राहणाऱ्या मुलांच्या मेंदूवर त्याचा वाईट परिणाम होतो व त्यांच्या मेंदूचे आकारमान कमी राहते तसेच त्यांची अध्ययन क्षमताही कमी होते, असे तीन विद्यापीठांच्या संयुक्त संशोधनात दिसून आले आहे. त्यामुळेच जास्तीत जास्त लोकांना दारिद्रय़ाच्या समस्येतून बाहेर काढणे किती महत्त्वाचे आहे याची साक्ष पटते. अनेकदा मुलांना दारिद्रय़ामुळे पुरेसे अन्न मिळत नाही शिवाय ते अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत असे दृश्य परिणामही दिसत असतात. या मुलांना आर्थिक स्थिती चांगली नसल्याने शाळेतही जाता येत नाही शिवाय त्यांना इतर कामास जुंपले जाते.
दारिद्रय़ाचा मेंदूवर नकारात्मक परिणाम होतो याचे पुरेसे पुरावे संशोधकांना आता मिळाले आहेत. मिशीगन, विस्कॉन्सिन व नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठातील वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनानुसार मेंदूतील करडय़ा रंगाच्या द्रव्याचा भाग नष्ट होत जातो व नेमका हाच भाग ही मुले ग्रहण करीत असलेल्या माहितीवर प्रक्रिया करीत असतो. करडय़ा रंगाच्या या मेंदूतील भागाचे आकारमानच कमी झाल्याचे दिसून आले आहे व फ्रंटल लोब (अग्रखंड) या मेंदूतील भागावरही परिणाम झालेला दिसून आला. लहान मुलांच्या मेंदूवर दारिद्रय़ामुळे होत असलेला हा परिणाम प्रत्यक्ष वर्गातही दिसून येतो. कमी उत्पन्न गटातील कुटुंबातून आलेल्या मुलांना उच्च आर्थिक सामाजिक स्तरातून आलेल्या मुलांपेक्षा चार ते पाच गुणांक कमी मिळालेले दिसून आले. दारिद्रय़ात राहणाऱ्या मुलांना शिकवण्यासाठी काही वेगळे उपायही करून बघण्यात आले पण त्याच्या नेमक्या परिणामाबाबत साशंकता आहे. या संशोधनातील प्रमुखांनी सांगितले, की हा अभ्यास गेल्या काही वर्षांपासून केला जात आहे पण त्यातही निधीअभावी संशोधन कार्यक्रमातून ५३ हजार मुलांना वगळावे लागले, अजूनही हा अभ्यास पुढे नेला जात असून आता आर्थिक तरतूद वाढवली असली, तरी ती अपुरी आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा