गरिबी ही केवळ मानसिक स्थिती असून, आत्मविश्वासाच्या जोरावर गरिबी हटविता येऊ शकते असे वक्तव्य काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे.
या वक्तव्यामुळे नवा वाद उभा राहण्याची चिन्हे आहेत.”गरिबी ही मानसिक स्थिती असून त्याचा जेवणासारख्या भौतिक गोष्टींशी संबंध नाही. जनता स्वत:मधला आत्मविश्वास जागवणार नाही तोपर्यंत नागरिक गरिबीतून बाहेर पडणार नाहीत” असेही राहुल गांधी म्हणाले. ते अलाहाबाद येथे महिलांच्या स्वयंसेवी संस्थांच्या मेळाव्यात बोलत होते.
गेल्या काही दिवसात काँग्रेसजनांनी गरिबीसंदर्भात अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. राहुल गांधींनी याआधी काँग्रेस नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून, अशी वक्तव्ये काँग्रेस नेत्यांनी करु नयेत अशी तंबीही दिली होती. परंतु, यावेळी खुद्द राहुल गांधींनी गरिबी ही मानसिक स्थिती असल्याचे वक्तव्य केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा