रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष अजूनही सुरुच आहे. रशियाकडून केल्या जाणाऱ्या हल्ल्यांमुळे युक्रेमध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू होत असून रशियाने आतापर्यंत युक्रेनमधील महत्त्वाच्या शहरांवर ताबा मिळवला आहे. रशियाने चेर्नोबील अणु प्रकल्पावरदेखील आपले सैनिक तैनात केले आहेत. रशियाने केलेल्या हल्ल्यात या अणुप्रकल्पाचे नुकसान झाले असून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार संयुक्त राष्ट्रांच्या टीमचा येथील न्यूक्लियर डेटा सिस्टिमशी संपर्क तुटला आहे. तसेच या अणुप्रकल्पाच्या परिसरातील वीजदेखील बंद करण्यात आली आहे.
चेर्नोबील अणुऊर्जा प्रकल्पामध्ये १९८६ साली मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेमध्ये येथे शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला होता. हा प्रकल्प सध्या बंद आहे. मात्र आणखी किरणोत्सर्ग होऊ नये म्हणून या प्रकल्पाची संयुक्त राष्ट्रांच्या तज्ज्ञ टीमकडून देखरेख करण्यात येते. मात्र रशिया आणि युक्रेनच्या युद्धात या अणुऊर्जा प्रकल्पाचे नुकसान झाले आहे. हा प्रकल्प सध्या रशियन सैनिकांच्या ताब्यात असून येथील वीज खंडित करण्यात आलीय. युक्रेनमध्ये विजेचा पुरवठा करणारे युक्रेनेर्गो यांनी याबाबतची सविस्तर माहिती आपल्या फेसबूक पेजवर दिली आहे. या अणुऊर्जा प्रकल्पावर रशियान सैनिकांकडून कारवाई केली जात असल्यामुळे येथे विजेचा पुरवठा सुरळीत होणे शक्य नाही, असंदेखील युक्रेनेर्गो यांनी सांगितलंय.
International Atomic Energy Agency chief Rafael Grossi indicated that remote data transmission from safeguards monitoring systems installed at the Chernobyl Nuclear Power Plant had been lost. The plant is no longer transmitting data to the UN watchdog: AFP reports
— ANI (@ANI) March 9, 2022
याआधी चेर्नोबील अणुऊर्जा प्रकल्पावरुन आम्हाला डेटा मिळत नसल्याचं संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीने (IAEA) सांगितले होते. या प्रकल्पामधून कोणताही डेटा ट्रान्समिट होत नसल्यामुळे येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जीविताचा प्रश्न उपस्थित झाला आहे, असं अणुऊर्जा एजन्सीने सांगितले होते. या ठिकाणाहून डेटा मिळत नाहीये; तसेच वीजदेखील खंडित झाल्यामुळे IAEA चे महासंचालक राफेल ग्रोसी यांनी या २००० कामगारांबाबत चिंता व्यक्त केली आहे. तर युक्रेनमधील आक्रमणादरम्यान, रशियाने चेर्नोबील आणि झापोरोझे अणुऊर्जा प्रकल्पांवर नियंत्रण मिळवले असून हे आण्विक चिथावणीचे प्रयत्न रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला, असं रशियन परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं आहे.
During the spl op in Ukraine, control has been established over the Chernobyl & Zaporozhye nuclear power plants. This was done exclusively to prevent any attempts to stage nuclear provocations, which is a risk that obviously exists: Russian Foreign Ministry Spox Maria Zakharova pic.twitter.com/NnBYlTTTxX
— ANI (@ANI) March 9, 2022