सध्या निवडणूक होत असलेल्या पाचपैकी चार राज्यांमध्ये भाजपचे सरकार पुन्हा येईल, असा विश्वास पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे. तसेच पंजीबमध्ये चांगली कामगिरी होईल, असा दावाही पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केला आहे. उत्तर प्रदेशमध्ये शेवटच्या व सातव्या टप्प्यात सोमवारी मतदान होत आहे. त्याचा प्रचार शनिवारी समाप्त झाला.
चार राज्यांत जनता भाजपला बहुमत देईल, असा विश्वास नड्डा यांनी व्यक्त केला. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा तसेच मणिपूरमध्ये पुन्हा भाजपची सत्ता येईल, असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला. उत्तर प्रदेशात तर पक्षाला प्रचंड बहुमत मिळेल, असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला आहे. काही नेत्यांनी पक्ष सोडला असला तरी त्याचा परिणाम मतदारांवर होणार नाही, असे शहा यांनी सांगितले. भाजपने सर्वच राज्यांमध्ये नियोजनबद्ध प्रचारमोहीम राबविल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाचही राज्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता प्रचंड आहे असे त्यांनी स्पष्ट केले.