केंद्रीय ऊर्जामंत्री पियूष गोयल नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत असतानाच शुक्रवारी अचानक लाईट गेली. खुद्द ऊर्जा मंत्र्यांची पत्रकार परिषद सुरू असतानाच नवी दिल्लीसारख्या ठिकाणी लाईट गेल्यामुळे काहीवेळ सभागृहात शांतता पसरली. पण या संधीचा फायदा घेऊन पियूष गोयल यांनी एक वैयक्तिक अनुभव सांगत वातावरण हलकेफुलके करण्याचा प्रयत्न केला.
माझ्या प्रत्येक कार्यक्रमात एकदा तरी लाईट गेली पाहिजे, असे माझ्या पत्नीला वाटते. यामुळे मला किंचितही विश्रांती न घेता किती मोठा पल्ला पार करायचा आहे, याची जाणीव होत राहिल, असे तिला वाटते, असे त्यांनी सांगितले. तिच्या सांगण्यामुळे लाईट घालवण्याची सवयच लागली की काय, असेही त्यांनी हसत हसत विचारले.

Story img Loader