जनमत चाचण्या ही लोकशाहीची थट्टा आहे. अशा चाचण्यांमध्ये पैशाचा वापर मोठय़ा प्रमाणात होत आहे. आपला पक्ष अशा चाचण्यांच्या पूर्णपणे विरोधात आहे. आमच्या पक्षाने नेहमीच जनमत चाचण्यांची कल्पना फेटाळून लावलेली आहे.
शरद यादव, संयुक्त जनता दल अध्यक्ष
या शहराच्या भविष्याच्या दृष्टीने काय केले पाहिजे, याचेच विचार माझ्या डोक्यात आहेत. राष्ट्रकुल घोटाळे किंवा मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांमागे धावण्याची माझी इच्छा नाही. असे करण्याने आम्ही स्वत:ची दिशा विसरून जाऊ. मला सकारात्मक गोष्टी करायच्या आहेत.
हर्ष वर्धन, भाजपचे दिल्लीतील मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार