छत्तीसगडमधील नियोजित ४ हजार मेगावॅट क्षमतेचा ऊर्जा प्रकल्प रद्द करण्याची नामुष्की केंद्र सरकारवर ओढवली आहे. या प्रकल्पासाठी अपेक्षित कोळसापुरवठा होणे अशक्य असल्याचे लक्षात आल्याने सरकारने हा निर्णय घेतल्याचे समजते.
छत्तीसगडमधील सरगुजा येथे हा महाप्रकल्प उभारण्यात येणार होता. तब्बल २० हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी मोठय़ा प्रमाणावर कोळसा आवश्यक होता, मात्र हा कोळसा ज्या खाणींमधून काढण्यात येणार होता, तेथे घनदाट जंगले असल्याने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने या खाणींनाच परवानगी नाकारली. येथे कोळसा खाणी सुरू केल्यास पर्यावरणावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकेल, असा अहवाल आल्याने ही परवानगी नाकारण्यात आली. महाऊर्जा प्रकल्पाचा कच्चा माल असणारा कोळसाच उपलब्ध होणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने सरकारने हा प्रकल्पच रद्द करण्याचा निर्णय घेतला. कोळसा खाणींना परवानगी मिळणे कठीण असल्याची कुणकूण लागल्याने एकाही कंपनीने या महाऊर्जा प्रकल्पासाठी निविदा भरली नव्हती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Power project of 4000 mw cancelled