Electricity Theft in Sambhal Utter Pradesh : उत्तर प्रदेशमधील संभलमधील दोन भागांमध्ये वीज वितरणामधील अनियमितेचा तपास करण्यासाठी छापे टाकण्या आले होते. या कारवाईच्या दुसर्याच दिवशी (रविवार) गेल्या वर्षभरात या भागातील चार मशिदी आणि एका मदरशातून १.३ कोटी रुपयांची वीज चोरी करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
संभल प्रशासनाने जवळपास ५० वर्षांनंतर नुकतेच पुन्हा उघडलेल्या पुरातन मंदिराच्या जवळच या मशिदी आणि मदरसा आहे. जिल्हा प्रशासनाकडून वीजचोरीविरोधात चालवलेल्या मोहिमेदरम्यान हे मंदिर आढळून आल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. तसेच संभलचे जिल्हा दंडाधिकारी राजेंद्र पेंसिया (Rajender Pensiya) यांनी दावा केला की, शनिवारी पहाटे ५ वाजता लाऊडस्पीकर्सची तपासणी सुरू असताना त्यांना या भागात वीज चोरी केली जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
संभलच्या दीपा सराई आणि नाई सराई या भागातदेखील पोलीस, जिल्हा प्रशासन आणि उत्तर प्रदेश वीज महामंडळ कर्मचार्यांच्या संयुक्त पथकाने दोन छापे टाकले होते.
एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली की, “दरवर्षी जवळपास ३०० कोटी रुपयांची वीज संभल नगर पालिका भागात पुरवली जाते. ज्यामध्ये लाईन लॉस हा ७२ टक्के इतका आहे. दीपा सराई आणि मिया सराई सारख्या भागात सर्वात जास्त (जवळपास ८५ टक्के) नुकसान होत आहे.”
तर जिल्हाधिकारी पेंसिया यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, सप्टेंबर महिन्यापासून या भागात वीजचोरी संबंधीत १,२५० एफआयआर दाखल झाल्या आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका मशिदीच्या वरच्या मजल्यावर बेकायदेशीर पॉवर हाऊस देखील आढळून आले. या पॉवर हाऊसमधून परिसरातील १०० घरांना वीज पुरवठा केला जात होता असा आरोप आहे. तर दुसऱ्या एका मशिदीत ९० पंखे, एक फ्रिज आणि ३० लाईट पॉइंट आढळून आले. तसेच येथील पॉवर मिटरदेखील बंद होते असा दावा पोलिसांनी केला आहे.
हेही वाचा>> “माझा नातू जिवंत आहे की… “; अतुल सुभाष यांच्या वडिलांनी व्यक्त केली चिंता, मोदी-योगी…
पात ते सहा पद्धती आढळल्या
“आमच्या वीजचोरी रोखण्याच्या मोहिमेत आम्हाला लोक वापरत असलेल्या पाच ते सहा पद्धती आढळून आल्या… त्यापैकी काही पद्धती या आमच्यासाठी नवीन आहेत. अशा प्रकारे वीज चोरी केली जाऊ शकते हे आम्हालादेखील माहिती नव्हते”, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी म्हणाले. तसेच लोक त्यांचे मीटर मुद्दाम चोरीला जाऊ देतात आणि वीज बील भरत नाहीत. तसेच ते वीज चोरीसाठी फेज-चेंजासरख्या पद्धत वापतात. तसेच मीटरपर्यंत जाणारी वायर दोन जागी विभागण्यात आल्याच्या घटनाही आम्हाला आढळून आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.