ग्वाटेमलामध्ये झालेल्या ७.४ रिस्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपात जवळपास ४८ जण मृत्यूमुखी पडले आहेत. ग्वाटेमलातील सर्व २२ प्रांतांना भूकंपाचा धक्का जाणवला. मेक्सिकोच्या सीमेलगत असलेल्या ग्वाटेमलातील सॅन मारकोस आणि क्वाटझेल्टनँगो या दोन प्रांतांत मोठे नुकसान झाले असून दरड कोसळल्याने महामार्गावर अडथळा निर्माण झाला आहे व घरे कोसळल्याने नागरिक रस्त्यावर आले आहेत.
दरम्यान शंभर जण गायब असून जवळपास शंभर जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
आज सकाळी तेथील स्थानिक वेळेनुसार १० वाजून ३५ मिनिटांनी हा भूकंप झाला. ग्वाटेमलाच्या २२ राज्यांना भूकंपाचा धक्का बसला असून इशान्य-पश्चिम दिशेला ९६५ अंतरावर असणा-या मेक्सिको शहरालाही याचे हादरे जाणवले.
सॅन मारकोस प्रांतात ४० जण मृत्यूमुखी पडले असून क्वाटझेल्टनँगोमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती अध्यक्ष ओट्टो पेरेझ मोलिना यांनी पत्रकारांना दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा