जवळपास एक तपापूर्वी अर्थात २००९ साली एलटीटीईचा म्होरक्या प्रभाकरनसोबतच या संपूर्ण संघटनेच्या मुसक्या आवळण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलं होतं. त्यामुळे दक्षिण भारतात, विशेषत: तामिळनाडू आणि आसपासच्या भागातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला होता. मात्र, त्यानंतर तब्बल १२ वर्षांनंतर पुन्हा एकदा या संघटनेनं डोकं वर काढल्याचं नुकत्याच झालेल्या एका कारवाईवरून स्पष्ट झालं आहे. तामिळनाडू पोलिसांनी एका गँगचा पर्दाफाश केला असून या संघटनेच्या पुनरुज्जीवनासाठी ही टोळी पैसा उभा करत असल्याची धक्कादायक बाब यातून समोर आली आहे. यासंदर्भात एका महिलेला पोलिसांनी अटक केली असून तिच्या माध्यमातून या सगळ्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेन्नई विमानतळावर पोलिसांनी मेरी फ्रान्सिस्को नावाच्या ५१ वर्षीय महिलेला अटक केली आहे. ही महिला श्रीलंकेची रहिवासी असून अनेक वर्षांपूर्वी ती कॅनडामध्ये स्थायिक झाली आहे. ही महिला मुंबईकडे जाणाऱ्या विमानात बसण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी तिला अटक केली. या महिलेकडे बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने तयार करण्यात आलेला भारतीय पासपोर्ट देखील सापडला आहे.

Baba Siddique murder case
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण : आकाशदीप गिलला पंजाबमधून अटक
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
pimpri chinchwad cyber police busted gang operating through China, Nepal crime news
चीन, नेपाळमधून सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
Paaru
अहिल्यादेवीचा जीव धोक्यात? बंदूक घेऊन किर्लोस्करांच्या घरात एका व्यक्तीने केला प्रवेश, ‘पारू’ मालिकेत मोठा ट्विस्ट
Bangladesh citizens Ratnagiri, Anti-Terrorism Squad,
रत्नागिरीत तेरा बांगलादेशी घुसखोरांना पकडले, दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई
Shah Rukh Khan News
शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला छत्तीसगडमधून अटक; ५० लाखांची मागितली होती खंडणी

कशी होती मोडस ऑपरेंडी?

या महिलेनं चौकशीदरम्यान त्यांची गँग कसं काम करत होती, याची सविस्तर माहिती दिली आहे. देशभरातील बँकांमध्ये कुणीही दावा न केल्यामुळे पडून असलेला पैसा या लोकांच्या निशाण्यावर होता. जर्मनी आणि स्वित्झर्लंडमध्ये राहणाऱ्या LTTE च्या दोन हितचिंतकांकडून हा पैसा हस्तगत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. हे दोघे भारताबाहेर कॅनडा, सिंगापूर आणि मलेशियामध्ये राहणाऱ्या लिट्टेच्या इतर हितचिंतकांच्या गटाचे सदस्य आहेत. बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने हा पैसा काढून भारत आणि विदेशातील निरनिराळ्या बँक खात्यांमध्ये हा पैसा वर्ग करण्यासाठी या गटाकडून काम केलं जातं. संघटनेच्या कामासाठी हा पैसा वापरण्याची त्यांची योजना होती.

मुंबईत होणार होता कोट्यवधींचा व्यवहार!

फ्रान्सिस्को या महिलेवर मुंबईतील फोर्ट परिसरात असलेल्या इंडियन ओव्हरसीज बँकेच्या एका जॉइंट अकाउंटमधून कोट्यवधी रुपये काढण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यासाठीच ती मुंबईला निघाली होती. डेन्मार्क आणि स्वित्झर्लंडमध्ये राहणाऱ्या तिच्या दोघा साथीदारांच्या सांगण्यावरूनच ती मुंबईला निघाली होती. हा पैसा LTTE साठी वापरला जाणार होता, असं या महिलेनं पोलिसांना सांगितलं आहे.