रेल्वेवरील दिवसेंदिवस वाढत जाणारा प्रवाशांचा ताण लक्षात घेता त्यातुलनेत कमी पडणारी आसन क्षमता यावर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी नवी क्लृप्ती शोधून काढली आहे. दहा तासांपेक्षा कमी अंतर असलेल्या रेल्वे प्रवासासाठी स्लीपर कोचऐवजी चेअर कारचा वापर करण्याचा प्रस्ताव सुरेश प्रभूंनी रेल्वे बोर्डाकडे मांडला आहे. यामुळे रेल्वेच्या प्रवासी क्षमतेमध्ये वाढ होईल असा रेल्वेमंत्र्यांचा मानस आहे. तसेच कमी पल्ल्याच्या अंतरावर डबलडेकर रेल्वेंची संख्या वाढविण्याचेही सुचविले आहे.  
सुरेश प्रभूंनी सुचविलेल्या कल्पनांची व्यवहार्यता सध्या रेल्वे बोर्ड पडताळून पाहत आहे. संबंधित झोन विभागांना यासंबंधीच्या शक्यतांची सविस्तर माहिती जमा करून देण्यास सांगितले आहे. जेणेकरून रेल्वेमंत्री आणि रेल्वेबोर्डाला या नवीन मुद्द्यांवर पुढचा निर्णय घेता येईल.
उन्हाळी सुटी आणि सणांच्या रेल्वेप्रवाशांच्या संख्येत अनेक पटींनी वाढ होते आणि काळात अपुऱया पडणाऱया रेल्वेगाड्या ही रेल्वे मंत्रालयासमोरील प्रमुख समस्या आहे. त्यामुळे दहा तासांपेक्षा कमी अंतराच्या रेल्वे प्रवासातील रेल्वेगाड्यांमध्ये स्लीपर कोच बसविण्याऐवजी चेअर कोच जोडण्याचा प्रस्ताव दिला असल्याचे सुरेश प्रभू म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा