शेतकरी आणि कामगारांसाठी मोदी सरकारने अखेरच्या अर्थसंकल्पामध्ये घोषणांचा पाऊस केला आहे. शेतमजुरांसह असंघटित कामगारांसाठी पियुष गोयल यांनी पेन्शन योजाना आणली आहे. २१ हजारांपेक्षा आधीक पगार असणाऱ्या असंघटित क्षेत्रातील कामगारांना प्रतिमहिना तीन हजार रूपये पेन्शन देण्यात येणार आहे. यासाठी कामगारांना प्रतिममहिना १०० रूपये भरावे लागणार आहे. ६० वर्षानंतर तीन हजार पेन्शन दिली जाणार आहे. याचा लाभ देशभरातील १० कोटी कामगारांना मिळणार आहे.
(Budget 2019: मोदी सरकारची शेतकऱ्यांना भेट, बँक खात्यात जमा होणार सहा हजार रुपये)
या योजनेचे नाव ‘प्रधानमंत्री श्रम योगी मानधन’ असे असणार आहे. वेतन आयोगाच्या शिफारशी लवकरच लागू कऱण्यात येतील. २१ हजार वेतन असलेल्या मजुरांना सात हजारांचा बोनस देण्यात येणार असून ग्रॅच्युईटची मर्यादा दहा लाखांवरुन २० लाखांवर करण्यात आली आहे. ईपीएफओच्या माध्यमातून हा 7 हजार बोनस मिळणार असल्याचंही गोयल यांनी जाहीर केलं आहे.
FM Piyush Goyal: A pension scheme is being launched called Pradhan Mantri Shram Yogi Mandhan, to provide assured monthly pension of 3000 rupees per month, with the contribution of 100 rupees per month, for workers in unorganized sector after 60 years of age https://t.co/qFNr9BKHxR
— ANI (@ANI) February 1, 2019
१५ हजारापेक्षा कमी वेतन असलेल्या मजुरांनाही पेन्शनची घोषणा केली आहे. ६० वर्षावरील मजुरांना तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. नोकरीदरम्यान मृत्यु झाल्यास आर्थीक मदत अडीच लाखांवरु सहा लाखांवर करण्यात आली आहे.
(Budget 2019 : देशातली महागाई कमी झाल्याचा अर्थमंत्री पियुष गोयल यांचा दावा)
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी आज संसदेत सादर केला