पीटीआय, श्रीहरिकोटा (आंध्र प्रदेश) : ‘चंद्रयान-३ मोहिमेंतर्गत ‘प्रज्ञान रोव्हर’ आणि ‘विक्रम लँडर’ योग्यरीत्या काम करत आहेत. ‘विक्रम’पासून ‘प्रज्ञान’ शंभर मीटर दूर गेला आहे. मात्र, आता चंद्रावरील रात्र सुरू होणार असल्याने या दोघांनाही निद्रिस्त (निष्क्रिय) केले जाईल,’ अशी माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख एस. सोमनाथ यांनी शनिवारी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोमनाथ म्हणाले, की ‘विक्रम’ आणि ‘प्रज्ञान’ अजूनही सुयोग्यरीत्या कार्यरत आहेत. आमचे पथक त्यावरील वैज्ञानिक उपकरणांच्या मदतीने बरेच काम करत आहे. ‘विक्रम लँडर’पासून प्रज्ञान रोव्हर शंभर मीटर दूर गेला आहे, ही चांगली बातमी आहे. येत्या एक-दोन दिवसांत आम्ही त्यांना निष्क्रिय करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहोत. कारण चंद्रावरील रात्र आता सुरू होणार आहे. ‘इस्रो’ने आपल्या पहिल्या सौर मोहिमेंतर्गत पहिली अवकाश सौर वेधशाळा ‘आदित्य एल१’च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर या मोहिमेच्या नियंत्रण कक्षातून बोलताना सोमनाथ यांनी ही माहिती दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pragyan is 100 meters away from vikram both will be deactivated as it will be night on the moon ysh