Ayodhya Ram Mandir Opening Ceremony : श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी आज राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा श्रीमान योगी असा उल्लेख केला. ते म्हणाले, “अमूक एक परिवर्तन आणण्यासाठी एखाद्या महापुरुषाला स्वतःचे जीवन अर्पावे लागते. आज देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने एक आदर्श व्यक्ती लाभले. आज राम मंदिरात केवळ एका मूर्तीची प्रतिष्ठापना झालेली नाही, तर या देशाची अस्मिता, स्वाभिमान आणि आत्मविश्वासाची पुन्हा प्रतिष्ठापना झाली आहे. ५०० वर्षांच्या प्रतिक्षेनंतर हे स्वप्न पूर्ण होत आहे.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधान मोदींनी तीन दिवसांऐवजी ११ दिवसांचा उपवास केला

स्वामी गोविंददेव गिरी महाराज म्हणाले की, मला २० दिवसांपूर्वी निरोप मिळाला की, पंतप्रधान मोदी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या तयारीसाठी काय करावे लागेल, हे विचारत आहेत. त्यासाठी काय नियम आहेत, असे मला विचारले गेले. आपल्या देशात राजकीय पुढारी कधीही काहीही करतात. पण पंतप्रधान मोदींनी नियम जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतातील सर्वोच्च आदर्श पुरूष प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी काय करावे लागले, हे जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

“मी आज प्रभू रामाची माफी मागतो, मला खात्री आहे की..”, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य चर्चेत

“पंतप्रधान मोदी यांनी केवळ तीन दिवसांचा उपवास करण्यास सांगितले होते. पण त्यांनी ११ दिवसांचा उपवास केला. एखाद्या राष्ट्रीय नेत्यांनी एवढा त्याग करणे सोपी गोष्ट नाही. तसेच दिव्य देशांचा प्रवास करावा असेही आम्ही सांगितले. मोदींनी नाशिकच्या पंचवटीपासून प्रवास सुरू केला ते कन्याकुमारीच्या रामेश्वरपर्यंत ते गेले. आम्ही तीन दिवस भूमिशयन करायला सांगतिले होते. पण या कडाक्याच्या थंडीत पंतप्रधान मोदी ११ दिवस भूमिशयन करत आहेत”, असेही स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच..

“तप करणे ही भारताची परंपरा राहिली आहे. आज या ठिकाणी मला एका राजाची आठण होत आहे, ज्यात हे सर्व गुण होते, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज”, असेही गोविंददेव गिरी यांनी सांगितले.

“राम मंदिर तिथंच बनवलंय जिथं…”, प्राणप्रतिष्ठा होताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रतिक्रिया

पंतप्रधान मोदी श्रीमान योगी…

“आज मला स्वामी समर्थ महाराज यांचीही आठवण होत आहे. त्यांनी शिवाजी महाराजांचे वर्णन करताना म्हटले, “निश्चयाचा महामेरू। बहुत जनांसी आधारू । अखंड स्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी”. आज आपल्याला असाच एक श्रीमंत योगी प्राप्त झाला आहे”, अशी भावना गोविंदगिरी महाराजांनी यावेळी व्यक्त केली.

यानंतर गोविंदगिरी महाराजांच्या हस्ते तीर्थ प्राशन करून पंतप्रधान मोदी यांनी ११ दिवसांचा उपवास सोडला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Praising swami gobind dev giri maharaj prime minister narendra modi was compared to chhatrapati shivaji maharaj kvg