महिलांचे लैंगिक शोषण आणि त्याचे व्हिडीओ बनविल्याप्रकरणी कर्नाटकमधील जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचा माजी खासदार प्रज्ज्वल रेवण्णा अटकेत आहे. यानंतर आता रेवण्णा कुटुंबियांवर आणखी एक आरोप झाला आहे. प्रज्ज्वल रेवण्णाचा मोठा भाऊ आणि जेडीएस पक्षाचा आमदार सुरज रेवण्णाही लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात चर्चेत आला आहे. हासन जिल्ह्यात सुरज रेवण्णाने पोलिसांत एक तक्रार दाखल केली. मला खोट्या लैंगिक अत्याचार प्रकरणात गोवण्याची धमकी देऊन खंडणी मागितली जात आहे, अशी तक्रार सुरज रेवण्णाने केली आहे. तर ज्याविरोधात तक्रार दाखल केली, त्याने लैंगिक अत्याचार झाले असल्याचा आरोप केला आहे.

प्रकरण काय आहे?

एफआयरनुसार, सुरज रेवण्णा आणि त्यांचा सहकारी शिवकुमार यांनी म्हटले की, चेतन आणि त्याचा एक नातेवाईक लैंगिक अत्याचाराची खोटी तक्रार दाखल करण्याची धमकी देऊन खंडणी उकळण्याचा प्रयत्न करत आहेत. पैसे न दिल्यास सुरज रेवण्णाची बदनामी करू, अशी धमकीही त्यांनी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

vidarbh election
विदर्भातील निवडणूक रिंगणात कोण कोणाचे नातेवाईक ?
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
pappu yadav death threat
“सलमान खान प्रकरणापासून दूर राहा, अन्यथा…”; लॉरेन्स बिष्णोई टोळीची अपक्ष खासदाराला धमकी!
Mayni Medical College , Financial Misappropriation Mayni Medical College,
मायणी वैद्यकीय महाविद्यालय आर्थिक गैरव्यवहार प्रकरण : दीपक देशमुख यांची अटक बेकायदा ठरवून जामिनावर सुटकेचे आदेश
loksatta editorial on fake court set up in ahmedabad zws
अग्रलेख : भामटे आणि तोतये…
Action taken against constable who asked for bribe to help accused
आरोपीला मदत करण्यासाठी लाच मागणाऱ्या हवालदारावर कारवाई
kiran samant
राजापूर विधानसभेसाठी शिंदे गटाचे किरण सामंत आणि ठाकरे गटाचे राजन साळवी यांचा उमदेवारी अर्ज दाखल
thackeray group nominated Kedar Dighe against CM Eknath Shinde in Kopri Pachapkhadi
मुख्यमंत्र्यांविरोधात आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे, ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर

प्रज्वल रेवण्णा सेक्स स्कँडल बाहेर काढणाऱ्या भाजपा नेत्याविरोधातही लैंगिक छळाची तक्रार, पोलिसांनी घेतलं ताब्यात

आरोपी चेतन हा सुरज रेवण्णाचा सहकारी असलेल्या शिवकुमारचा मित्र आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे नोकरी मिळावी यासाठी त्याने शिवकुमारला गळ घातली होती. लोकसभा निवडणुकीदरम्यान आपण सुरज रेवण्णाची भेट घालून देऊ, असे आश्वासन शिवकुमारने चेतनला दिले होते.

१७ जून रोजी चेतनने शिवकुमारला फोन केला. आदल्या दिवशी आपण सुरज रेवण्णाच्या फार्महाऊसवर नोकरी मागण्यासाठी गेलो होतो, असा दावा चेतनने केला. मात्र नंतर त्याने स्वतःवर लैंगिक अत्याचार झाल्याचे सांगितले. तसेच रेवण्णा आणि त्यांच्या कुटुंबियांना बदनाम करण्याची धमकी दिली. आपल्याला ५ कोटी रुपये दिले नाहीत तर आपल्यावर लैंगिक अत्याचार केले गेले, अशी तक्रार करण्याची धमकी चेतनने दिली.

प्रज्वल रेवण्णा प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले…

सुरज रेवण्णाने आणि शिवकुमार या धमकीकडे कानाडोळा केल्यानंतर चेतनने खंडणीची रक्कम कमी कमी करत ती अडीच कोटींवर आणली. चेतनचा आणखी एक नातेवाईकही या धमकी प्रकरणात सहभागी झाला आणि त्याने चेतनच्या फोनवरून शिवकुमारला धमकी देणारे संदेश पाठविले.

चेतनच्या धमकीमुळे सुरज रेवण्णा आणि शिवकुमार यांनी पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी चेतनवर भारतीय दंड संहिता कायद्याच्या कलम ३८४, कलम ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

‘तर नाव बदलेन’, पवन कल्याण निवडणूक जिंकताच बड्या नेत्याने खरोखरंच स्वतःचं नाव बदललं

सुरज रेवण्णान लैंगिक अत्याचार केले?

आरोपी चेतनने एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, आपण नोकरी मागण्यासाठी सुरज रेवण्णाच्या फार्महाऊसवर गेलो होतो. तिथे माझ्यावर लैंगिक अत्याचार झाले. “सुरज रेवण्णाने त्याचे हात माझ्या खांद्यावर ठेवले आणि माझ्या शरीरावर तो हात फिरवत होता. त्यानंतर जे व्हायला नको ते माझ्याबरोबर झाले. हा प्रकार बाहेर येऊ नये यासाठी सुरज रेवण्णाच्या सहकाऱ्याने मला पैसे आणि नोकरी देण्याचे आश्वासन दिले”, असा आरोप चेतनने केला.