जनता दल सेक्युलर या पक्षाचे आमदार एच.डी. रेवण्णा आणि त्यांचे पुत्र खासदार प्रज्ज्वल रेवण्णा या दोघांनाही सेक्स स्कँडल प्रकरणात समन्स जारी करण्यात आलं आहे. सूत्रांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. या दोघांनाही एसआयटी चौकशीसाठी हजर होण्यासंदर्भात हे समन्स बजावण्यात आलं आहे. प्रज्ज्वल रेवण्णांच्या घरी काम घरकाम करणाऱ्या एका महिलेच्या तक्रारीनंतर रविवारी हासन या ठिकाणी पोलीस तक्रार केली होती. यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोणत्या कलमांसह गुन्हा दाखल करण्यात आला?

भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ अ (लैंगिक शोषण), ३५४ ड (पाठलाग करणे), कलम ५०६ (धमक्या देणं), कलम ५०९ (महिलेच्या स्वाभिमानाचा अपमान) या कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणात अनेक व्हिडीओ आहेत ही बाब समोर आली आहे. प्रज्ज्वल रेवण्णांशी संबंधित कथित सेक्स स्कँडल प्रकरणाची दखल महिला आयोगाने घेतली आहे. त्यानंतर अतिरिक्त पोलीस महासंचालक बी. के. सिंह यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करण्यात आली आहे या संदर्भातच पिता-पुत्राला समन्स बजावण्यात आलं आहे.

हे पण वाचा- सेक्स स्कँडल प्रकरणी खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्यावर निलंबनाची कारवाई; जेडीएस पक्षाचा निर्णय

प्रज्ज्वल रेवण्णा फरार

अश्लील व्हिडीओ पेन ड्राईव्ह प्रकरणात प्रज्ज्वल रेवण्णांना जेडीएस या पक्षाने निलंबित केलं आहे. प्रज्ज्वल रेवण्णांचे तीन हजारांहून अधिक आक्षेपार्ह अश्लील व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या सगळ्या घडामोडी घडत असतानाच प्रज्ज्वल रेवण्णा जर्मनीला फरार झाले आहेत.देशात सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. अशातच कर्नाटकमध्ये मात्र कथित सेक्स स्कँडल प्रकरण समोर आले आहे. माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे नातू प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे कर्नाटकाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांच्यावर लैंगिक अत्याचाराच्या आरोपानंतर जनता दल सेक्युलरने (जेडीएस) प्रज्वल रेवण्णा यांचे पक्षातून निलंबन केले आहे.

काय आहे प्रकरण?

समोर आलेल्या माहितीनुसार २०२४ मध्ये होलनरसीपुरातले भाजपाचे उमेदवार देवराज गौडा यांनी बी. वाय. विजयेंद्र यांना एक पत्र लिहिलं होतं. ज्या पत्रात प्रज्ज्वल रेवण्णा आणि एच.डी. देवेगौडा यांच्या कुटुंबातील अनेक नेत्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. देवराज यांचं म्हणणं आहे की त्यांच्याकडे जो पेनड्राईव्ह आहेत त्यात २९७६ अश्लील व्हिडीओ आहेत. या व्हिडीओंमधल्या काही महिला सरकारी कर्मचारी असल्याचाही दावा करण्यात आला आहे. महिलांचं लैंगिक शोषण सुरु ठेवण्यासाठी त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी या व्हिडीओंचा वापर केला जातो असंही देवराज यांनी म्हटलं आहे. तसंच भाजपाचे नेते देवराज यांनी हे म्हटलं आहे की पेनड्राईव्ह मधले काही फोटो आणि व्हिडीओ असे आहेत जे काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांकडेही गेले होते. आता या प्रकरणात रेवण्णा पिता पुत्रांना समन्स बजावण्यात आलं आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prajwal revanna father summoned by probe team in sex tapes case said sources scj
Show comments