कर्नाटक सेक्स स्कँडल प्रकरणी आरोपी प्रज्वल रेवण्णाला ३१ मे रोजी बंगुळूरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. प्रज्वल रेवण्णावर कर्नाटकमधील अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील कथित सेक्स व्हिडीओचा पेन ड्राइव्हही बाहेर आल्याची चर्चा आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी कर्नाटक सरकारने एसआयटी स्थापन केलेली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आरोपीला अटक केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. मात्र, प्रज्वल रेवण्णा एसआयटीला तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती समोर आली आहे. सेक्स स्कँडल प्रकरणी आरोपी प्रज्वल रेवण्णा हा एसआयटीच्या प्रश्नांना टाळत असून तपासात सहकार्य करत नाही, असे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने इंडिया टुडेने दिले आहे. एसआयटीचे पथक आरोपी प्रज्वल रेवण्णाला आज किंवा सोमवारी घटनास्थळी नेवून तपास करण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : “पंतप्रधान मोदींनी ध्यानधारणा करून सूर्याला शांत केलं, त्यामुळे आता…”, खासदार रवी किशन यांचं वक्तव्य

माहितीनुसार, प्रज्वल रेवण्णाला अटक केल्यानंतर न्यायालयाने ६ जून पर्यंत कोठडी सुनावली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू असताना प्रज्वल रेवण्णाने एसआयटीच्या प्रश्नांना उडवाउडवीची उत्तरं दिली. तसंच हा माझ्याविरुद्ध कट रचला असून आपण काहीही चुकीचं केलं नसल्याचं प्रज्वल रेवण्णाचं म्हणणं आहे.

दरम्यान, या प्रकरणात प्रज्वल रेवण्णाच्या आईचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली होती. मात्र, त्या चौकशीसाठी हजर झाल्या नाहीत. तसेच त्यांच्या निवासस्थानी जाऊन पोलिलांनी चौकशी केली असता त्या त्यांना तेथे मिळून आल्या नाहीत. त्यामुळे आता भवानी रेवन्ना यांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यांनी चौकशी टाळली तर एसआयटीकडून त्यांनाही अटक होण्याची शक्यता आहे.

नेमकं प्रकरण काय?

एका महिन्याभरापूर्वी कर्नाटकमधील मतदानानंतर सेक्स स्कँडल प्रकरण चर्चेत आलं. प्रज्वल रेवण्णा याच्या ड्रायव्हरनं या सगळ्या क्लिप असणारा पेनड्राईव्ह पोलिसांच्या हवाली केला होता. त्यानंतर पोलिसांनी प्रज्वल रेवण्णाचा शोध सुरू केला. मात्र, तोपर्यंत तो विदेशात फरार झाला होता. त्याच्याविरोधात लुकआऊट नोटिसाही काढण्यात आल्या होत्या. गेल्या महिन्याभरात त्याचा कोणताही ठावठिकाणा लागला नव्हता. तसंच, त्याच्याकडून या संपूर्ण प्रकरणावर कोणतंही भाष्य किंवा बाजू मांडण्यात आली नव्हती. त्यानंतर तो ३१ मे रोजी भारतात परतताच पोलिसांनी प्रज्वल रेवण्णाला अटक केली. अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप प्रज्वल रेवण्णावर आहे

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prajwal revanna sex scandal case big update prajwal revanna is not cooperating with the police in the investigation gkt