कर्नाटकमध्ये खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या सेक्स स्कँडल प्रकरण समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली. प्रज्ज्वल रेवण्णा यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप होताच त्यांनी भारतातून पळ काढला. त्यानंतर त्यांचे वडील एचडी रेवण्णा यांच्यावरही गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. सेक्स स्कँडल प्रकरण समोर आल्यानंतर जनता दल (सेक्युलर) पक्ष अडचणीत आला. यानंतर पक्षाने खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांचं पक्षातून निलंबन केलं. यानंतर आता एचडी कुमारस्वामी यांनी त्यांचा पुतण्या प्रज्ज्वल रेवण्णा यांना भारतात येण्याचं आवाहन केलं आहे.

एचडी कुमारस्वामी म्हणाले, प्रज्ज्वल रेवण्णा यांना मी आवाहन करतो की, “त्यांनी लवकरात लवकर भारतात यावं आणि पोलिसांना तपासात सहकार्य करावं. चोर-पोलिसांचा हा खेळ किती दिवस चालणार? जर तुम्ही राजकारणात पुढे जावे अशी तुमच्या आजोबांची इच्छा होती. आता त्यांच्या प्रतिष्ठेचा आदर करत असाल तर भारतात परत या”, असं जाहीर आवाहन कुमारस्वामी यांनी प्रज्ज्वल रेवण्णा यांना केलं आहे.

Eknath Shinde On Sharad Pawar
Eknath Shinde : शरद पवार-एकनाथ शिंदे संपर्कात आहेत का? मलिकांच्या ‘त्या’ विधानावर मुख्यमंत्र्यांचं भाष्य; म्हणाले, “दुसरा विचार…”
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Rahul Gandhi Amravati
“पंतप्रधान मोदींना स्मृतीभ्रंश झालाय, ते आजकाल…”; अमरावतीतल्या सभेतून राहुल गांधींचा हल्लाबोल!
Rahul Gandhi Amravati
Rahul Gandhi: “अदानींसाठीच भाजपने आमचे सरकार पाडले”, राहुल गांधी यांचा आरोप
Rahul gandhi
Rahul Gandhi : “आदिवासी अधिकाऱ्याला मागे बसवलं जातं अन्…”, नंदूरबारमध्ये राहुल गांधींचा मोठा दावा!
yogi Adityanath batenge to katenge
‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक हैं तो सेफ हैं’, योगी आदित्यनाथ यांची घोषणा
What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : “काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं बाळासाहेबांवर अधिक प्रेम आणि..”, संजय राऊत काय म्हणाले?
Leader of Opposition in Lok Sabha and Congress leader Rahul Gandhi.
Rahul Gandhi : राहुल गांधींनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रचाराची सुरुवात विदर्भापासून का केली?

हेही वाचा : कॅनडा, ऑस्ट्रेलियासह अरब राष्ट्रांमधून AAP ला अवैध निधी; ईडीने गृहमंत्रालयाला सोपवला अहवाल

या कथित सेक्स स्कँडल प्रकरणातील आरोपी प्रज्वल रेवण्णा हे कर्नाटकच्या हसन मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. याच मतदारसंघातून ते भाजपा-जेडीएस युतीचे उमेदवारही आहेत. मात्र, सेक्स स्कँडल प्रकरण बाहेर येताच त्यांनी विदेशात पळ काढला. यानंतर आता रेवण्णा यांच्या विरोधात पोलिसांकडून लुक आउट नोटीस जारी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास कर्नाटक पोलिसांचं विशेष पथक करत आहे.

कुमारस्वामींनी मागितली पीडितांची माफी

कुमारस्वामी यांनी या सेक्स स्कँडल प्रकरणातील पीडितांची माफी मागितली. ते म्हणाले, “मी पुन्हा एकदा माझ्या माता-भगिनींची जाहीर माफी मागतो. त्यांची मानसिक वेदना मी समजू शकतो. ही बाब अस्वीकारार्ह आहे. या घटनेमुळे आमची मान शरमेने झुकली आहे”, असं कुमारस्वामी म्हणाले.

कुटुंबातील सदस्यांचे फोन टॅप होत असल्याचा आरोप

माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी आज आरोप केला की, सेक्स स्कँडल प्रकरणात त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे तसेच समर्थकांचे फोन टॅप केले जात आहेत. यावरून कुमारस्वामी यांनी राज्य सरकारवर त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची हेरगिरी केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, कुमारस्वामी यांनी केलेल्या आरोप उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी फेटाळून लावले आहेत. तसेच हे आरोप निराधार असल्याचं डीके शिवकुमार यांनी म्हटलं आहे.