: टूजी दूरसंचार घोटाळ्यात यापूर्वीच्या एनडीए सरकारला गोवण्याचा प्रयत्न गुरूवारी विशेष न्यायालयाने उधळून लावला. माजी दूरसंचारमंत्री प्रमोद महाजन आणि तत्कालीन सचिव श्यामलाल घोष यांनी अतिरिक्त स्पेक्ट्रमचे वाटप खासगी कंपन्यांना करण्याचे कारस्थान रचले होते हे सिद्ध करण्यास सीबीआय असमर्थ ठरले आहेत, असे न्यायालयाने म्हटले आहे. अतिरिक्त स्पेक्ट्रमचे वाटप करण्याबाबत महाजन आणि घोष यांच्यात मतभिन्नता होती आणि हे सादर करण्यात आलेल्या पुराव्यांवरून सिद्ध होत असल्याचे विशेष सीबीआय न्यायाधीश ओ. पी. सैनी यांनी म्हटले आहे.

Story img Loader