भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या मुलीने एक पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजणार यात दुमत असण्याचं कारण नाही. ‘In Pranab, My Father : A Daughter Remembers’ या पुस्तकात शर्मिष्ठा मुखर्जींनी असं म्हटलं आहे की प्रणव मुखर्जी त्यांना हे म्हणाले होते की राहुल गांधींना परिपक्वता येणं बाकी आहे. राहुल गांधी विनम्र आहेत, त्यांना अनेक प्रश्नही पडतात. मात्र राजकीय परिपक्वता त्यांच्यात आलेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय उल्लेख आहे पुस्तकात?

पुस्तकात हा उल्लेखही आहे की राहुल गांधी राष्ट्रपती भवनात येऊन प्रणव मुखर्जींची भेट घेत असत. प्रणव मुखर्जींनी त्यांना कॅबिनेटमध्ये सहभागी होऊन अनुभव मिळवा असाही सल्ला दिला होता. मात्र राहुल गांधींनी या सल्ल्याकडे लक्ष दिलं नाही. २५ मार्च २०१३ या दिवशी प्रणव मुखर्जी एका दौऱ्यावर गेले होते तिथे ते म्हणाले की राहुल गांधी यांना अनेक विषयांमधली आवड आहे. मात्र एक विषय सोडून ते चटकन दुसऱ्या विषयांकडे वळतात हे सगळे उल्लेख पुस्तकात आहेत. या शिवाय सोनिया गांधींबाबतही एक महत्वाचा उल्लेख आहे.

सोनिया गांधी मला पंतप्रधानपद देणार नाहीत

शर्मिष्ठा मुखर्जींनी आपल्या पुस्तकात लिहिलं आहे जेव्हा २००४ मध्ये प्रणव मुखर्जींना पंतप्रधान होऊ शकता का हे विचारलं गेलं तेव्हा ते म्हणाले होते की, नाही, सोनिया गांधी मला पंतप्रधान करणार नाहीत. पुढे शर्मिष्ठा यांनी हे देखील म्हटलं आहे की सोनिया गांधींनी प्रणव मुखर्जींना पंतप्रधान केलं नाही म्हणून त्यांच्या मनात कुठलीही नाराजी नव्हती. तसंच मनमोहन सिंग यांच्याशीही माझ्या वडिलाचं (प्रणव मुखर्जी) शत्रुत्व नव्हतं किंवा त्यांच्या विषयी आकस नव्हता.

प्रणव मुखर्जी हे काँग्रेसचे खासदार होते. तसंच त्यांनी काँग्रेसच्या सत्ता काळात अर्थमंत्री म्हणून, परराष्ट्र मंत्री म्हणून, संरक्षण मंत्री म्हणूनही काम केलं आहे. २०१२ ते २०१७ या कालावधीत प्रणव मुखर्जी हे भारताचे राष्ट्रपती होते. काँग्रेसचे दिग्गज नेते असा त्यांचा लौकिक होता. ३१ ऑगस्ट २०२० या दिवशी त्यांचं निधन झालं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pranab mukherjee had said about rahul gandhi he is yet to mature claims daughter sharmistha in book scj
Show comments