आम आदमी पक्षाच्या लोकपाल विधेयकाचे वर्णन ‘महाजोकपाल’ असे करणारे पक्षाचे माजी नेते प्रशांत भूषण यांनी जनलोकपाल विधेयकावर जाहीर चर्चा करण्याचे आव्हान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिले आहे. सोमवारी हे विधेयक विधानसभेत मांडले जाईल, त्या वेळी विधानभवनाबाहेर धरणे देण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
‘आप’ मधून काढून टाकण्यात आल्यानंतर आपल्यासह योगेंद्र यादव यांनी सुरू केलेल्या ‘स्वराज अभियान’च्या नावाखाली चालवले जाईल, असे भूषण म्हणाले. आपण अराजकीय असल्याचा दावा करणाऱ्या या संघटनेने २०१५ च्या जनलोकपाल विधेयकाच्या मुद्यावर आम आदमी पक्षाला लक्ष्य केले आहे.
भूषण यांच्या विधानावर ‘आप’ने त्वरित काही प्रतिक्रिया दिली नसली, तरी ज्येष्ठ वकील असलेले प्रशांत भूषण हे भाजपच्या सांगण्यावरून या विधेयकाविरुद्ध बोलत असल्याचा आरोप पक्षाने यापूर्वी केला आहे.

Story img Loader