आम आदमी पक्षाच्या पत्रकार परिषदेमध्ये पुन्हा एकदा तरुणाने गोंधळ घातला. पक्षाचे नेते प्रशांत भूषण बोलत असताना या तरुणाने त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करीत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यानंतर संबंधिताला पत्रकार परिषदेमधून बाहेर काढण्यात आले.
काश्मीरमध्ये सैन्य ठेवण्याबाबत जनमत घेण्याच्या प्रशांत भूषण यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आपण ही कृती केल्याचे गोंधळ घालणाऱया व्यक्तीने सांगितले. यापुढेही आम आदमी पक्षाच्या पत्रकार परिषदांमध्ये याच पद्धतीने गोंधळ घालणार असल्याचा इशाराही त्याने दिला. विष्णू गुप्ता असे या व्यक्तीचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी आम आदमी पक्षाने गाझियाबादमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्येही विष्णू गुप्ता यानेच गोंधळ घातला होता. दरम्यान, गोंधळ घालण्याचा हा प्रकार म्हणजे कॉंग्रेस आणि भाजपचा संयुक्त कट असल्याचा आरोप प्रशांत भूषण यांनी पत्रकार परिषदेनंतर केला.
प्रशांत भूषण यांच्या पत्रकार परिषदेत तरुणाचा गोंधळ
आम आदमी पक्षाच्या पत्रकार परिषदेमध्ये पुन्हा एकदा तरुणाने गोंधळ घातला.
First published on: 13-01-2014 at 07:11 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prashant bhushans press conference disrupted by repeat offender