भारतात निवडणूक रणनीतीकार म्हणून प्रशांत किशोर यांचं नाव आघाडीवर आहे. २०१४ साली झालेली लोकसभा आणि अनेक निवडणुकांत राजकीय पक्षांच्या मिळालेल्या विजयात प्रशांत किशोर यांचा मोठा वाटा आहे. त्यातच प्रशांत किशोर यांनी जगनमोहन तेलुगू देसम पक्षाचे ( टीडीपी ) प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची भेट घेतली आहे. प्रशांत किशोर यांची ‘आयपॅक’ ही रणनीती आखणी कंपनी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यासाठी काम करते आहे. त्यामुळे प्रशांत किशोर यांनी जगनमोहन रेड्डींचे कट्टर विरोधक चंद्राबाबू नायडू यांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०१९ साली आंध्रप्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या युवाजना श्रमिका रायतू काँग्रेस पक्षाची ( वायएसआर ) रणनीती आखण्याचं काम केलं होतं. या निवडणुकीत ‘वायएसआर’ काँग्रेसनं १७५ पैकी १५१ जागा जिंकत चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाचा मोठा पराभव केला होता. चंद्रबाबू नायडूंच्याा ‘टीडीपी’ला केवळ २३ जागांवर समाधान मानावं लागलं होतं.

प्रशांत किशोरांनी काय म्हटलं?

चंद्राबाबू नायडू आणि प्रशांत किशोर यांच्यात तीन तास चर्चा झाली. या भेटीबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रशांत किशोर म्हणाले, “ही फक्त सदिच्छा भेट होती. चंद्रबाबू नायडू हे एक ज्येष्ठ नेते आहेत. अनेक दिवसांपासून चंद्राबाबू नायडू यांना माझी भेट घ्यायची होती.”

डेक्कन हेरॉल्डनं दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी ( २३ डिसेंबर ) चंद्राबाबू नायडू यांचे पूत्र नारा लोकेश आणि प्रशांत किशोर खासगी विमानानं विजयवाडा येथे पोहोचले होते. त्यामुळे आगामी काळात आंध्रप्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर चंद्राबाबू नायडू यांच्यासाठी रणनीतीकार म्हणून काम करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prashant kishor meet tdp leader chandrababu naidu in vijaywada ssa