निवडणूक रणनितीकार म्हणून ओळख असलेले प्रशांत किशोर यांनी राजकारणातील सद्य परिस्थतीबद्दल काही परखड मते व्यक्त केली आहेत. सध्या प्रशांत किशोर हे तृणमुल काँग्रेसससाठी गोवा दौऱ्यावर आहेत. तेथे एका कार्यक्रमात त्यांनी सध्याच्या राजकारणातील भाजपाचे स्थान, तसंच राहून गांधी, काँग्रेस यांच्यापुढील आव्हाने यावर भाष्य केलं आहे. प्रशांत किशोर हे काँग्रेसपासून खास करुन राहुल गांधी यांच्यापासून दूर गेल्याचंही त्यांच्या वक्तव्यावरुन दिसून येत आहे. 

३० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळणारा भाजप हा राष्ट्रीय राजकारणातून पुढील काही वर्षे सहजासहजी दूर जाणार नसल्याचं परखड मत प्रशांत किशोर यांनी व्यक्त केलं आहे. ” पण समस्या ही राहुल गांधी यांच्याबाबतची आहे. ते समजतात की भाजपला जनता लगेच दूर करेल. पण हे एवढं सहजासहजी शक्य नाहीये “, असं मत प्रशांत किशोर यांनी व्यक्त केलं आहे. “जोपर्यंत त्यांचे ( मोदी ) सामर्थ्य काय आहे ते तपासत नाहीत, समजून घेत नाहीत आणि ओळखत नाही, तोपर्यत तुम्ही त्यांना पराभूत करण्यासाठी कधीही सक्षम होणार नाही”, असंही प्रशांत किशोर म्हणाले.

उत्तर प्रदेशमधील घटनांबाबात राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी उचललेल्या पावलांवरुन समजलं जात आहे की काँग्रेसचं पुनरुज्जीवन होत आहे. पण काँग्रेसच्या खोलवर रुजलेल्या समस्या आणि संघटनात्मक रचनेतील कमकुवतपणा यावर त्वरीच उपाय नाही असं सांगत काँग्रेसच्या पुनरुज्जीवनाबाबतच्या चर्चेबद्दल सावध प्रतिक्रिया प्रशांत किशोर यांनी दिली आहे.

Story img Loader