राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काही मुद्द्यांवर एकमत न झाल्यामुळे काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचे नाकारले. त्यानंतर आता प्रशांत किशोर यांनी काँग्रेसवर कठोर शब्दांत टीका केली आहे. काँग्रेस पक्षामुळे माझे खूप नुकसान झाले. हा पक्ष म्हणजे बुडतं जहाज आहे, असं प्रशांत किशोर म्हणाले आहेत. ते बिहारमध्ये हाजीपूर येथे बोलत होते.
हेही वाचा >> ठरलं! हार्दिक पटेल भाजपात प्रवेश करणार; २ जून रोजी पक्षप्रवेश सोहळा
यावेळी बोलताना, “काँग्रेस पक्षामुळे माझे रेकॉर्ड खराब झाले. हा पक्ष स्वत:मध्ये सुधारणा करत नाही. त्यामुळे हा पक्ष आमचेही नुकसान करेल. काँग्रेसबद्दल माझ्या मनात आदर आहे. मात्र सध्या काँग्रेसची हीच परिस्थिती आहे. मी २०११ ते २०२१ या काळात एकूण ११ निवडणुकांमध्ये काम केले. यामध्ये एका निवडणुकीसाठी मी यांच्यासोबत काम केले आणि ही निवडणूक हारलो. त्यामुळे मी तेव्हापासूनच ठरवले होते की यापुढे काँग्रेससोबत काम करणार नाही. मात्र या पराभवानंतर मी खूप काही शिकलो,” असे प्रशांत किशोर म्हणाले. जनसत्ता या हिंदी वृत्तसंकेतस्थळाने याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे.
हेही वाचा >> “२०१४ च्या तुलनेत आता देशाच्या सीमा अधिक सुरक्षित” – पंतप्रधान नरेंद्र मोदी
दरम्यान, मागील महिन्यात प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी शक्यता व्यक्त केली जात होती. काँग्रेस पक्ष आणि प्रशांत किशोर यांच्यामध्ये याबद्दल चर्चादेखील झाली होती. मात्र काही विषयांवर एकमत न झाल्यामुळे काँग्रेसमध्ये सामील होणार नसल्याचं किशोर यांनी ट्विट करुन सांगितलं होतं. पक्षप्रवेश नाकारताना त्यांनी काँग्रेसला नेतृत्वाची गरज आहे आणि संघटनात्मक बदल करत पक्षामधील समस्या सामूहिकपणे दूर करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी नोंदवले होते.
हेही वाचा >> काशी, मथुरा वादावर भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांचे मोठे विधान, म्हणाले “आमच्या अजेंड्यावर…”
दरम्यान, आता प्रशांत किशोर यांनी काँग्रेसविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेसला त्यांनी बुडता पक्ष म्हटल्यामुळे काँग्रेस यावर काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.