आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून पूर्ण बहुमताचा दावा करण्यात येत आहे. मात्र, त्याचवेळी विरोधकांच्या इंडिया आघाडीकडून भाजपाच्या सत्ताकाळात घडलेल्या घडामोडींचा दाखला देत यावेळी भाजपा सत्तेतून बाहेर पडेल, असा दावा केला जात आहे. या परस्परविरोधी दाव्यांमध्ये नेमकं लोकसभा निवडणुकांचं चित्र कसं असेल? याविषयी राजकीय विश्लेषकांमध्ये सध्या मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस अड्डा’मध्ये बोलताना लोकसभा निवडणुकांच्या रणनीतीवर भाष्य केलं आहे. भाजपाच्या हिंदुत्वाला नेमकं विरोधकांनी काय उत्तर द्यायला हवं, यावर प्रशांत किशोर यांनी आकडेवारी मांडली आहे.

भाजपाच्या हिंदुत्ववादाच्या भूमिकेला विरोधकांकडून किंवा काँग्रेसकडून कशाप्रकारे सध्या उत्तर दिलं जात आहे, याचा उल्लेख होताच प्रशांत किशोर यांनी विरोधकांची ही पद्धतच चुकीची ठरवली आहे. यासाठी त्यांनी भाजपाला मिळणारी मतांची आकडेवारी व विरोधकांसाठी उरलेली मतांची आकडेवारी सादर केली.

hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
Anil Deshmukh criticized BJP and amit shah
बोलघेवडेपणा करू नका!अमित शहा यांच्या नेत्यांना कानपिचक्या
Sanjay Raut on MVA
Sanjay Raut on MVA: महाविकास आघाडी फुटली का? संजय राऊतांनी केलं स्पष्ट; म्हणाले, “आम्ही भाजपामध्ये असताना…”
Image Of MVA
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या स्वबळाच्या भूमिकेमागे नेमकी कारणं काय?
santosh deshmukh latest news in marathi
‘‘संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशी द्या”, वाशीममध्ये सर्वपक्षीय मोर्चात मूक आक्रोश
Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान

“लाकडासाठी आपण जंगल घालवतोय!”

“आपण लाकडासाठी आख्खं जंगल घालवून बसतोय. दिल्लीत बसलेल्या अनेकांना हिंदुत्व वगैरेच्या संकल्पनांची भुरळ आहे. आपण तथ्थ्यांवर बोलुयात. जे भाजपाच्या हिंदुत्वावर विश्वास ठेवतात, जे मोदींचे चाहते आहेत, ते त्यांच्याबरोबर आहेत हे आपण मान्य करुयात. संस्था, विचारसरणी असं सगळं त्यांच्याबरोबर आहे. पण हे सगळं एकत्र केलं तरी त्यांचं प्रमाण फक्त ३८ टक्के आहे. भाजपाला मतदान करणाऱ्या मतदारांचं प्रमाण फक्त ३८ टक्के आहे. त्यामुळे (२०१९मध्ये) हिंदुत्व, विचारसरणी, संघटनात्मक ताकद, सत्तेची ताकद असूनही ६२ टक्के मतदार भाजपाच्या विरोधात होते. त्यामुळे इथे खरं आव्हान हे आहे की या उरलेल्या ६२ टक्क्यांपैकी बहुमत विरोधकांना आपल्या बाजूने कसं वळवता येईल”, असं प्रशांत किशोर म्हणाले.

इंडिया आघाडीच्या मूळ धोरणावरच आक्षेप

“याकडे पाहण्याचा एक दृष्टीकोन हा आहे की हे सगळे ६२ टक्के (मिळणारे पक्ष) एका खोलीत एकत्र येतील आणि त्यांना ६२ टक्के मतं मिळतील. हेच सध्याच्या इंडिया आघाडीबाबत घडत आहे. पण याचा फायदा होणार नाही. तुम्हाला फक्त पक्ष एकत्र आणून भागणार नाही. तुम्हाला त्यांच्यात एकवाक्यता आणावी लागेल. त्यांच्या प्रचाराच्या बाबतीत, त्यांच्या धोरणांच्या बाबतीत. फक्त पक्षांमधल्या लोकांना एकत्र आणल्यामुळे तुम्हाला ६२ टक्के मिळणार नाहीत”, असं म्हणत प्रशांत किशोर यांनी इंडिया आघाडीच्या मूळ धोरणावरच आक्षेप घेतला.

“मी जर सल्ला द्यायचा असता, तर मी सांगितलं असतं की…”

“भाजपाविरोधात लढणाऱ्या किंवा लढण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुणाला जर मी सल्ला देत असेन, तर मी एवढंच सांगेन की त्या ३८ टक्क्यांमध्ये आणखी २ टक्के मिळवून असं गृहीत धरा की ४० टक्के मतदार तुम्हाला मतदान करणार नाहीत. पण तरीही ६० टक्के मतं तुमच्यासाठी राहतात. ६० टक्क्यांपैकी ६० टक्के मतं मिळवण्यासाठी प्रयत्न कसे करता येतील हे विरोधकांनी पाहायला हवं. त्यानंतर ३६-३७ टक्के मतं तुम्हाला मिळतील”, असं गणित यावेळी प्रशांत किशोर यांनी मांडलं.

“१० वर्षांत ३ वेळा भाजपा बॅकफूटवर होती, पण काँग्रेसनं तिन्ही संधी गमावल्या”, प्रशांत किशोर यांनी मांडलं गणित!

“…तोपर्यंत त्यांच्यापैकी कुणीही तुमच्याकडे येण्याची हिंमत दाखवणार नाही”

“असं झालं, तर तुम्ही भाजपाच्या ३८ टक्क्यांसमोर स्पर्धेत याल. एकदा का तुम्ही त्यांच्या स्पर्धेत आलात, की मग त्यांच्याकडच्या ३८ टक्क्यांमध्येही तडे पडायला सुरुवात होईल. मग ते पाठिंबा देणाऱ्यांच्या स्वरूपात असतील, काडरमधले असतील किंवा थेट नेत्यांमधले असतील. पण जोपर्यंत तुम्ही ३० टक्के मतांचा टप्पा पार करत नाही, तोपर्यंत त्यांच्याकडचं कुणीही तुमच्याशी हातमिळवणी करण्याची हिंमत दाखवणार नाही. त्यामुळे मी हिंदुत्वाचा सामना कसा करायचा यावर वेळ घालवणार नाही. या हिंदुत्वासोबत नसणाऱ्यांना कसं एकत्र करू शकेन यावर मी लक्ष देईन. त्यानंतर मी हे बघेन की हिंदुत्वावर विश्वास असणाऱ्यांचं मन वळवून त्यांना माझ्या बाजूने करता येईल का? ६० टक्के मतदार भाजपाच्या हिंदुत्वासोबत नाहीत. आपण त्यांच्यावर काम का करत नाहीये?” असा सवाल प्रशांत किशोर यांनी विरोधकांच्या धोरणावर उपस्थित केला.

“आम्ही अक्षरश: काँग्रेसकडे भीक मागत होतो की कृपा करून…”, प्रशांत किशोर यांनी सांगितला २०१५ चा ‘तो’ प्रसंग!

“२०१९ साली राम मंदिर नव्हतं, २०१४ मध्येही राम मंदिर नव्हतं. राम मंदिर हा मोठा चर्चेचा मुद्दा करण्यात आला आहे. यामुळे भाजपाच्या काडरला, समर्थकांना प्रोत्साहन मिळालं आहे. त्यामुळे भाजपासाठीची मतदानाची टक्केवारी वाढू शकेल. कदाचित लोक मोठ्या संख्येनं मतदानासाठी बाहेर पडू शकतील. पण हे त्या ६२ टक्क्यांपर्यंत जाईल का? कदाचित नाही”, असा अंदाजही प्रशांत किशोर यांनी वर्तवला आहे.

Story img Loader