Pratap Sarangi Allegations On Rahul Gandhi : गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर संसद परिसरात सत्ताधारी-विरोधकांमध्ये मोठा गदारोळ चालू आहे. यामध्ये भाजपाचे खासदार प्रताप चंद्र सारंगी जखमी झाले असून, त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. यानंतर सारंगी यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यामुळे त्यांना दुखापत झाल्याचा आरोप केला आहे.

या प्रकारानंतर खासदार प्रताप चंद्र सारंगी म्हणाले की, “मी संसद भवनाच्या पायऱ्यांवर उभा असताना मागून आलेल्या राहुल गांधी यांनी एका खासदाराला ढकलले आणि तो खासदार माझ्या अंगावर पडल्याने मी सुद्धा पडलो.”

Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal : “केजरीवाल आणि पंतप्रधान मोदी यांच्यात फरक नाही, दोघेही…”; राहुल गांधींच्या टीकेला आप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Controversy over MLA Suresh Khades statement about Miraj constituency as mini Pakistan
मिरजेच्या उल्लेखावरून वातावरण तापले
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
Income Tax raid on BJP MLA Harvansh Singh Rathore
भाजपाच्या माजी आमदाराच्या घरात आढळल्या मगरी; भ्रष्टाचार प्रकरणात प्राप्तीकर विभागाने धाड टाकताच अधिकारीही चक्रावले
PM Narendra Modi on Godhra Train Burning
“मी जबाबदारी घेतो, हवं तर लिहून देतो, पण…”, पंतप्रधान मोदींचं गोध्रा जळीतकांडावर भाष्य
Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis
Vijay Wadettiwar : ‘देवेंद्र फडणवीसांनी आता नरेंद्र मोदींचं वारसदार व्हावं’, विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान
Mahavikas Aghadi News
MVA : काँग्रेस नेत्याचा मविआला घरचा आहेर, “लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदासाठी वाद घातले, एकमेकांवर कुरघोड्या..”

दरम्यान या आरोपांना उत्तर देताना विरोधीपक्ष नेते राहुल गांधी म्हणाले की, “मी प्रवेशद्वाराजवळ उभा होतो तेव्हा भाजपाचे खासदार माझी वाट अडवत होते. ते मला धमकी देत मला धक्काबुक्की करत होते.”

ही सर्व घटना गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर गुरुवारी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या खासदारांच्या निषेध आंदोलनादरम्यान घडली.

हे ही वाचा : “लिव्ह-इन रिलेशनशिप आणि समलैंगिक विवाहामुळे सामाजिक व्यवस्था कोसळेल”, नितीन गडकरींचे मोठे विधान

काय आहेत जखमी खासदाराचे आरोप?

संसद भवनात घडलेल्या या सर्व प्रकारावर बोलताना भाजपाचे खासदार प्रताप चंद्र सारंगी म्हणाले, “मी पायऱ्यांवर उभा होतो. तेव्हा राहुल गांधी यांनी खासदार मुकेश राजपूत यांना धक्का दिला. त्यामुळे ते माझ्या अंगावर पडल्यानेही मी सुद्धा जखमी झालो.”

दरम्यान या घटनेत खासदार प्रताप चंद्र सारंगी आणि खासदार मुकेश राजपूत जखमी झाले आहेत. या दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हे ही वाचा : भाजपा खासदाराचा राहुल गांधींवर धक्काबुक्की करुन पाडल्याचा आरोप, स्पष्टीकरण देत म्हणाले, “मला संसदेत…”

कोण आहेत प्रताप चंद्र सारंगी?

प्रताप चंद्र सारंगी (Pratap Chandra Sarangi) ओडिशातील बालासोर लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे खासदार आहेत. १९५५ मध्ये जन्मलेल्या सारंगी यांनी कला शाखेची पदवी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी गण शिक्षण मंदिर योजनेच्या माध्यमातून शाळा सुरू केल्या. पुढे २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर २०२१ मध्ये त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात लघू, सुक्ष्म आणि मध्यम उद्योग खात्याचे मंत्री म्हणून स्थान मिळाले. ६९ वर्षांचे असलेल्या सारंगी यांनी आतापर्यंत त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक महत्त्वांच्या पदांवर काम केले आहे.

Story img Loader