पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डॉ. प्रवीण तोगडिया यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. २०११ ते २०१८ पर्यंत विश्व हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडिया आंतरराष्ट्रीय अध्यक्ष होते. विश्व हिंदू परिषदेत असताना प्रवीण तोगडिया यांनी अशोक सिंघल यांच्यासोबत राम मंदिर आंदोलनात मोलाची भूमिका बजावली होती. मात्र जून २०१८ मध्ये त्यांना संघटनेपासून दूर करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद नावाची वेगळी संघटना तयार केली. आपल्या संघटनेच्या माध्यमातून प्रवीण तोगडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहित भाजपाच्या धोरणांवर टीकेचे बाण सोडतात. आजही प्रवीण तोगडिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“पंतप्रधान नरेंद्र मोदी बाजूला बसतच नाही. बसले तर समजवू शकतो ना. त्यांना राम मंदिरच्या सुरुवातीला बाबरी मशिदीसाठी लढणारा अन्सारी प्रिय वाटतो. मात्र राम मंदिरासाठी लढणारा प्रवीण तोगडिया आवडत नाही. त्यांना बाबूंनी बिघडवलं. ते खूप चांगले व्यक्ती होते.”, असा मिश्किल टोला प्रवीण तोगडिया यांनी लगावला.

अखेर नवज्योत सिंह सिद्धू यांच्या सल्लागाराचा राजीनामा; कारण…!

“भारताचा इकॉनॉमिक मॉडेल बदलावा लागेल. यापूर्वी आता आपला जीडीपी खाली आला आहे. मात्र तो वाढत होता. एक टक्का जीडीपी वाढला तर एक कोटी रोजगार उपलब्ध झाले पाहीजेत. हे आंतरराष्ट्रीय गणित आहे. भारतात जे मॉडेल आहे. एक टक्का जीडीपी वाढताच एक कोटी रोजगार तयार होत नाहीत. ही जॉबलेस ग्रोथ आहे. जीडीपी वाढतो तेव्हा सरकारच्या कराच्या माध्यमातून मिळकत वाढते.”, असं मत प्रवीण तोगडिया यांनी एबीपी माझ्याशी बोलताना मांडलं.