उत्तर प्रदेशात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे एका दिव्यांग व्यक्तीने प्रांतिया रक्षक दलाच्या ( पीआरडी ) जवानांना पाणी मागितलं होतं. यावरून दोन जवानांनी दिव्यांग व्यक्तीला धमकी देत मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तर प्रदेशातील देवरिया शहरात शनिवारी ( २९ जुलै ) ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. सचिन सिंह असं दिव्यांग व्यक्तीचं नाव आहे. तर, राजेंद्र मणी आणि अभिषेक सिंह असं दोन पीआरडी जवानांची नावे आहेत. ही घटना समोर आल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा : “माफ कर मुली…”, अपहरण झालेल्या मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर केरळ पोलिसांचं ट्वीट

मुंबईत रेल्वे अपघातात सचिनला पाय गमवावे लागले आहेत. सचिन सिम कार्ड विक्री आणि डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. या घटनेबद्दल बोलताना सचिनने सांगितलं की, “शनिवारी रात्री उशिरा जेवन करून घरी परतत होतो. तेव्हा रस्त्यात एक कासव दिसले. ते कासव दुग्धेश्वरनाथ मंदिराजवळील तलावात नेऊन सोडले.”

हेही वाचा : ना नोकरी ना पैसा; सीमा-सचिनच्या जोडीची उदरनिर्वाहासाठी धडपड

“तळ्यावरून परत येत असताना दोन पीआरडी जवान दिसले. कासव हातात घेतल्यामुळे वास येत होता. म्हणून मी त्यांच्याकडे पाणी मागितलं. पण, पीआरडी जवानांनी तुरुंगात टाकण्याची धमकी देत मारहाण केली. त्यांनी माझ्या ट्रायसायकलची चावीही हिसकावून घेतली,” असं सचिनने म्हटलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prd jawans abused and hit specially abled man asked for water in uttar pradesh deoria ssa
Show comments