गोव्याच्या तटवर्ती क्षेत्राजवळ फुटलेल्या जहाजातून पाण्यात पडलेले अनेक कंटेनर गोवा-कोकण तटवर्ती क्षेत्राकडे वाहून येत आहेत का, यावर भारतीय तटरक्षक दल बारकाईने लक्ष ठेवून आहे.
एमव्ही एमओएल कम्फर्ट हे कंटेनर वाहून नेणारे मे. मितसुई ओसाका लाइन्स कंपनीचे जहाज असून त्यावर ४२६८ कंटेनर होते. कोलंबोहून जेद्दाह येथे हे जहाज जात असताना गोव्याच्या तटवर्ती क्षेत्रानजीकच भर समुद्रात ते फुटले.
या जहाजावर जो माल भरण्यात आला होता त्यामध्ये शस्त्रे आणि स्फोटकांचा साठा असल्याचे गोवा सरकारने यापूर्वीच जाहीर केले आहे. या जहाजाचा तुटलेला एक भाग २४ जून रोजी येथून ५३० सागरी मैलावर आढळला
होता.
सदर जहाज खोल समुद्रात असल्याने कंटेनर मध्येच बुडाले असण्याची शक्यता तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक एस. डी. भानोत यांनी सांगितले.
सदर कंटेनर तीरावर वाहून येण्याची भीती नाही ते समुद्रातच बुडाले असतील, असेही ते म्हणाले.