Preeti Makhija : केशर पान मसाला या कंपनीचे मालक हरीश मखिजा यांच्या पत्नी प्रीती मखिजा यांचा अपघाती मृत्यू झाला. हरीश मखिजा आणि त्यांच्या पत्नी प्रीती यांचा कारचा टायर आग्र लखनौ एक्स्प्रेस वे वर अचानक फुटला आणि हा भयंकर अपघात झाला. केशर पान मसाला कंपनीचे मालक हरीश मखिजा, त्यांच्या पत्नी प्रीती मखिजा, मद्य व्यावसायिक तिलक राज शर्मा यांची पत्नी आणि चालक असे चौघेजण प्रवास करत होते. या अपघातात प्रीती मखिजा यांचा मृत्यू झाला आहे तर इतर सगळे प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माईलस्टोन ७९ जवळ झाला अपघात

केशर पान मसाला ही कानपूरची प्रसिद्ध मसाला कंपनी आहे. माइलस्टोन ७९ जवळ हरीश मखिजा यांच्या कारचा अपघात झाला. या अपघातात त्यांच्या पत्नी प्रीती मखिजा यांचा मृत्यू झाला आहे. हरीश मखिजा उत्तर प्रदेश विधानसभा अध्यक्ष सतीश महाना यांचे नातेवाईक आहेत. त्यांच्या कारचा टायर फुटून हा अपघात झाला.

नेमकी काय घटना घडली?

समोर आलेल्या माहितीनुसार हरीश मखिजा, प्रीती मखिजा, तिलक राज शर्मा यांच्या पत्नी हे सगळे एका खासगी समारंभासाठी जात होते. कानपूरहून आग्रा या ठिकाणी जात असताना करहल टोलच्या जवळ त्यांची कार पोहचली. त्यावेळी एक मोठ्ठा आवाज होऊन त्यांच्या कारचा टायर फुटला. कार अनियंत्रित झाला आणि अपघात झाला. कारण टायर फुटल्याने चालकाचं कारवरचं नियंत्रण सुटलं होतं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Preeti makhija wife of owner keshar paan masala harish makhija accidental death scj