Delhi Pregnant teen murder: सोशल मीडियामुळे अल्पवयीन मुलांवर विपरीत परिणाम होत आहे. हा धोका ओळखण्यात अजूनही काही पालक अपयशी ठरत आहेत. त्यामुळे संपूर्ण देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. दिल्लीच्या नांगलोई भागात राहणाऱ्या सोनी नावाच्या मुलीचा प्रियकराकडून निर्घृण खून करण्यात आला आहे. १९ वर्षांची सोनी सात महिन्यांची गर्भवती होती. तिने तिचा प्रियकर संजू ऊर्फ सलीमकडे लग्नाचा तगादा लावला. ज्यामुळे सलीमने त्याच्या दोन मित्रांच्या मदतीने हरयाणाच्या रोहतक येथे सोनीचा खून केला आणि नंतर तिला एका शेतात पुरले.
पश्चिम दिल्लीच्या नांगलोई भागात राहणारी सोनी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय होती. इन्स्टाग्रामवर तिचे सहा हजार फॉलोअर्स होते. ती सोशल मीडियावर तिचे आणि प्रियकर संजू ऊर्फ सलीमचे फोटो आणि व्हिडीओ नेहमी पोस्ट करायची. पोलिसांनी सांगितले की, सोनी गर्भवती राहिल्यानंतर सलीमला लग्नासाठी आग्रह करत होती. पण सलीम लग्नासाठी तयार नव्हता, तो तिला गर्भपात करण्याचा सल्ला देत होता. या कारणावरून दोघांमध्ये अनेकदा भांडणही झालं होतं. सोमवारी (२१ ऑक्टोबर) सोनियाने आपल्या घरातून काही वस्तू घेतल्या आणि ती सलीमला भेटण्यासाठी गेली.
२१ ऑक्टोबर रोजी सोनीचा भाऊ मनीष कुमारने पोलिसांत तक्रार दाखल केली. चौकशीदरम्यान पोलिसांनी संजू ऊर्फ सलीम आणि त्याचा मित्र पंकजला अटक केली. त्यानंतर दोघांनीही खूनाची कबुली दिली. मनीषने सांगितले की, सलीम आमच्या मागच्या घरातच राहत होत. मागच्या दीड वर्षांपासून ते एकमेकांशी बोलत होते.
हे वाचा >> नवऱ्याबरोबर मंदिरात गेलेल्या नवविवाहितेवर पाच जणांचा सामूहिक बलात्कार; व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी
कसा झाला सोनीचा खून?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजू ऊर्फ सलीम, पंकज, ऋितिक आणि आणखी एका अज्ञात इसमाने भाड्याने गाडी घेतली आणि दिल्लीवरून हरियाणा गाठले. सलीमने सोनीला करवा चौथचा उपवास ठेवायला सांगितला आणि उपवास सोडण्यासाठी सलीम तिला भेटला. सोनीला घेऊन हरियाणाला जात असताना वाटेत रोहतक येथे सलीम आणि सोनीमध्ये पुन्हा भांडण झालं. त्यानंतर संजूने सोनीचा गळा दाबून खून केला. तिथेच झुडुपात चार फुटांचा खड्डा खणून सोनीला पुरण्यात आले.
सोमवारी बहीण बेपत्ता झाल्यानंतर मनीषने तिला फोन केला होता. तेव्हा सलीमने फोन उचलला आणि सांगितले की, सोनी त्याच्याशी बोलू इच्छित नाही. तसेच तिला आमचे घर कायमचे सोडायचे आहे, असेही सलीमने सांगितले. पोलिसांत तक्रार दाखल केल्यापासून ते सलीमला अटक होईपर्यंत आपली बहीण जिवंत आहे, असा मनीषचा समज होता. मात्र सलीमने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर मनीषच्या कुटुंबियांवर आभाळ कोसळले.
मनीषने सांगितले की, सोनीने दहावीत असतानाच शाळा सोडली होती. ती इन्स्टाग्रामवर सक्रिय होती.