तामिळनाडूत रक्तसाठय़ांची तपासणी सुरू

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

विरुधुनगर, तामिळनाडू

संसर्ग असलेल्या व्यक्तीने दान केलेल्या रक्ताच्या संक्रमणातून येथील २४ वर्षांच्या गर्भवती महिलेला एचआयव्हीची लागण झाली असून, तामिळनाडू सरकारने तेथील रक्ताच्या साठय़ाची तपासणी करण्याचा आदेश दिला आहे. रक्तपेढय़ातील रक्त विषाणूमुक्त असावे यासाठी खातरजमा करण्यात येत आहे.

या प्रकरणी सत्तूर येथील सरकारी रुग्णालयाशी संबंधित एका कर्मचाऱ्यास काढून टाकण्यात आले असून इतर दोघांना निलंबित करण्यात आले आहे, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्य सरकारने म्हटले आहे, की महिलेवर विषाणूचा परिणाम होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात येत असून, राज्यातील रक्तपेढय़ातील रक्त तपासून आढावा घेण्यात येत आहे.

आरोग्य सेवा सहसंचालक आर. मनोहरन यांनी सांगितले, की या महिलेला सत्तूर येथील खासगी रुग्णालयात बाळंतपणासाठी दाखल केले होत. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार रक्तपेढीतून रक्त आणून ते तिला देण्यात आले, पण दात्यालाच एचआयव्ही झालेला होता. या महिलेचे रक्त तपासले असता तिला एचआयव्हीची लागण झाल्याचे दिसून आले. प्राथमिक चौकशीनुसार रक्तपेढीच्या कर्मचाऱ्याने रक्ताची तपासणी योग्य प्रकारे केली नाही व तसेच खासगी रुग्णालयाला दिले.

दात्याचे रक्त तपासणाऱ्याने ते सुरक्षित असल्याची पट्टी त्यावर लावली होती. राज्याचे मच्छीमार मंत्री डी. जयकुमार यांनी सांगितले, की रक्तपेढी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असून, जिल्हाधिकाऱ्यांनी या घटनेवर खेद व्यक्त केला  आहे. आता सर्वच रक्ताचे नमुने तपासले जाणार आहेत. दरम्यान, ही महिला व तिच्या पतीने सत्तूर पोलिसात तक्रार दाखल केली असून डॉक्टर, परिचारिका व रक्तपेढी कर्मचारी यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. महिलेच्या पतीने या बाबत तामिळनाडू सरकारला जबाबदार ठरवले आहे.