गरोदर महिलांनी सुंदरकांड आणि रामायण वाचलं पाहिजे. त्यामुळे सृदृढ मुलं जन्माला येतात असं वक्तव्य तेलंगणच्या राज्यपाल तमिलिसाई सौंदरराजन यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होणार की काय? अशी चर्चा आता होते आहे. सौंदरराजन यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित एका गर्भ संस्कार शिबीरात हे वक्तव्य केलं आहे. रामायण, महाभारत आणि सुंदरकांड यांसारखे ग्रंथ वाचल्याने सृदृढ मुलं जन्माला येतात. त्यामुळे गरोदर स्त्रियांनी ही पुस्तकं वाचली पाहिजेत असं त्या म्हणाल्या आहेत.

तामिलिसाई सौंदरराजन या स्वतः एक स्त्री रोग तज्ज्ञ आहेत. संवर्धिनी न्यासाच्या अंतर्गत गर्भ संस्काराचं एक शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात आलेल्या महिलांना संबोधित करत असताना सौंदरराजन यांनी सृदृढ मुलं जन्माला घालण्यासाठी वैज्ञानिक आणि पारंपरिक उपाय काय असतात त्यावर भाष्य केलं. तसंच आपण हे सांगणार आहोत कारण गरोदर महिलांनी संस्कारी आणि देशभक्त मुलांना जन्म दिला पाहिजे अशी आपली यामागची धारणा आहे असंही सौंदरराजन म्हणाल्या.

Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Nana Patole
Nana Patole : “उत्तमराव जानकरांसह आम्ही खूप लोक राजीनामा द्यायला तयार, पण…”; नाना पटोलेंचं मारकडवाडीत मोठं विधान
What Nitesh Rane Said?
Ladki Bahin Yojana : “दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्या मुस्लिम कुटुंबांना लाडकी बहीण योजनेतून वगळा”, आमदार नितेश राणेंची मागणी
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Sunny Deol Confirms His Role in Ramayana
नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटात काम करण्याबाबत सनी देओलकडून भूमिका स्पष्ट; म्हणाला, “हा चित्रपट ‘अवतार’प्रमाणे…”
Gashmeer Mahajani
“…तरच मूल होऊ द्या”, पालकत्वाविषयी स्पष्टच बोलला गश्मीर महाजनी; म्हणाला, “तुम्ही आई-वडील म्हणून कैद…”
rekha lata mangeshkar
“देवा पुढल्या जन्मी…”, रेखा यांनी सांगितला लता मंगेशकरांबद्दलचा ‘तो’ किस्सा; म्हणाल्या, “मला त्यांनी…”

संविर्धिनी न्यास ही राष्ट्र सेविका समितीची एक शाखा आहे. या कार्यक्रमात संबोधित करताना सौंदरराजन यांनी गर्भ संस्कार हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे असं मह्टलं आहे. तसंच यासाठी संविर्धिनी न्यास जे प्रयत्न करतं आहे ते देखील वाखाणण्याजोगे आहेत असंही म्हटलं आहे. वैज्ञानिक आणि समग्र दृष्टीकोन यातून याकडे पाहिलं पाहिजे. याचे परिणाम हे नक्कीच सकारात्मक होतील असंही त्या म्हणाल्या. ANI ने हे वृत्त दिलं आहे.

सौंदरराजन यांनी आणखी काय म्हटलंय?

विविध गावांमध्ये आम्ही पाहिलं आहे की गरोदर स्त्रिया या रामायण, महाभारत आणि विविध प्रकारच्या संस्कार घडवणाऱ्या गोष्टी या कालावधीत वाचत असतात. तामिळनाडूत अशी मान्यता आहे की जेव्हा महिला गरोदर राहते तेव्हा तिने रामायण आणि सुंदरकांड वाचलं पाहिजे. गरोदर स्त्रियांनी सुंदरकांड वाचणं आणि रामायण वाचणं हे जन्माला येणाऱ्या मुलासाठी खूप चांगलं आहे. सुंदरकांड हा रामायणातलाच एक अध्याय आहे असंही त्या म्हणाल्या. संविर्धिनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी असंही सांगितलं की आम्ही हा गर्भ संस्कार कार्यक्रम संपूर्ण देशात पोहचवणार आहोत. देशभरातल्या डॉक्टरांना भेटून तो संपूर्ण देशात लागू कसा करता येईल याविषयी विचारणार आहोत.

Story img Loader