गरोदर महिलांनी सुंदरकांड आणि रामायण वाचलं पाहिजे. त्यामुळे सृदृढ मुलं जन्माला येतात असं वक्तव्य तेलंगणच्या राज्यपाल तमिलिसाई सौंदरराजन यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होणार की काय? अशी चर्चा आता होते आहे. सौंदरराजन यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित एका गर्भ संस्कार शिबीरात हे वक्तव्य केलं आहे. रामायण, महाभारत आणि सुंदरकांड यांसारखे ग्रंथ वाचल्याने सृदृढ मुलं जन्माला येतात. त्यामुळे गरोदर स्त्रियांनी ही पुस्तकं वाचली पाहिजेत असं त्या म्हणाल्या आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in