मृत्युपूर्व जबानी नोंदवून घेण्यात येत असताना संबंधितांचे नातेवाईक उपस्थित राहिल्याने त्याने दिलेली जबानी अवैध ठरत नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. पत्नीची हुंडय़ासाठी हत्या केल्याच्या आरोपावरून पती आणि सासूला ठोठाविण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करताना सर्वोच्च न्यायालयाने वरील निर्वाळा दिला.
मृत्युपूर्व जबानी दंडाधिकाऱ्यामार्फत नोंदविण्यात येण्याचा प्रघात आहे आणि त्या वेळी नातेवाईकांना हजर राहण्याची मुभा नाही, कारण जबानी नोंदविताना नातेवाईकांचा संबंधितांवर प्रभाव पडण्याची शक्यता असते.
हुंडय़ासाठी पत्नीला जाळून ठार मारल्याच्या आरोपावरून पती आणि सासूला जन्मठेपेची शिक्षा ठोठावताना पत्नीने दिलेली मृत्युपूर्व जबानी ग्राह्य़ धरण्यात आली. मात्र जबानी देताना पत्नीचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये हजर होते, त्यामुळे जबानी ग्राह्य़ धरता येणार नाही, असा बचाव आरोपींनी केला होता. तो न्या. पी. सदाशिवम् आणि एम. वाय. इक्बाल यांच्या पीठाने फेटाळला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा